Beneficiary Log-in:    
Google
No News/ Info available.

मान्यवरांचे मनोगत:

मान्यवरांचॆ मनॊगत

श्री. हणमंतराव गायकवाड, संस्थापक अध्यक्ष-भारत विकास ग्रुप, पुणे - प्रमुख पाहुणे, २०१८

• गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता निरीक्षण व बेसिक नॉलेज चांगले करावे.
• जगात संधी प्रचंड असून, असे काही करा त्यातून समाजहित, देशहित घडण्यासह तुमचे आयुष्य घडेल.
• दररोज काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
• जगाच्या पाठीवर कुठेही काम करण्याची तयारी ठेवा.
• आजच्या जगात नुसते चांगले असून भागत नाही, त्यासाठी कायमसर्वोत्तमच असले पाहिजे.

श्री. विजयबाबू दर्डा, अध्यक्ष-लोकमत मीडिया प्रा. लि., नागपूर - प्रमुख पाहुणे, २०१८

• गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यात येते.
• शिक्षण हे एकच असे माध्यम आहे कि ज्याने सुसंस्कृत देश घडू शकतो तसेच संपूर्ण जग बदलू शकते. आणि याच माध्यमातून पुढे सुंदर भारतासाठी सुंदर विधाता घडू शकतो.

श्री अविनाश धर्माधिकारी ,निवृत्त भा.प्र.से. अधिकारी व संस्थापक, चाणक्य मंडळ परिवार, पुणे – प्रमुख पाहुणे, २०१७

जीवन आणि करिअर घडविण्याचे त्रिसूत्र:

१. 'स्वओळख' - प्रत्येकजण बुद्धिमान आहे, पण प्रत्येकाने आपली बुद्धी कुठे चालते ते ओळखले पाहिजे. दुसऱ्याकडे पाहून कोणत्या क्षेत्रात जायचे, हे ठरवू नका.
२. 'स्वनिर्णय' - स्वतःचे मन कशात रमते व स्वतःची क्षमता यावर क्षेत्र निवडा. जीवनाची दिशा त्यानुसार ठरवा व जागतिक स्पर्धेत तयार व्हा.
३. 'समर्पित' - जागतिक पातळीवरील स्पर्धेचा विचार करून निवडलेल्या क्षेत्रात पूर्णपणे पारंगत, उत्तम व प्रतिभावंत व्हा. त्या क्षेत्रासाठी स्वतःला समर्पित करा, यशस्वी जीवनाची पायाभरणी या टप्प्यातच होते.

डॉ. राजन वेळूकर, माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ – प्रमुख पाहुणे, २०१६

• विद्यार्थ्यांनी हि मदत एक संधी म्हणून पाहावी आणि त्याद्वारे विकास साधावा. मुख्य म्हणजे  शिक्षण आणि विकास यांचा परस्पर संबंध आहे. कारण जितके  जास्त शिक्षण  तेवढा देशाचा विकास जास्त होतो.
• तुम्हाला जे क्षेत्र आवडते तेच क्षेत्र निवडा . आपल्या विद्याशाखेच्या पलीकडे जाऊन विचार करा. 'तुम्हाला जे मिळाले, ते ज्याला मिळाले नाही त्याला देणे' म्हणजे शिक्षण होय. जीवन एक संघर्ष नसून उत्सव आहे.

प्रा. पी.पी. पाटील, कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - प्रमुख पाहुणे, २०१६

• श्री. सुरेशदादा जैन यांनी एसडी-सीडचा उपक्रम हा जातीपातींपलीकडे राबवून शिक्षणासंबंधी मोठे काम हाती घेतले आहे.
• गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आर्थिक विवंचनेतील विद्यार्थ्यांना  या माध्यमातून मदत मिळते. यामुळे विद्यार्थ्यांसमोरील  अडचणी दूर होतात.

प्रा. प्रकाश पाठक, कार्यकारी संचालक, भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक - प्रमुख पाहुणे, २०१६

• उद्याची जीवनाची सूत्रे समजून घेताना विद्यार्थ्यांनी जगातील ज्ञानाच्या मागे झपाटल्यासारखे लागावे.
• शिष्यवृत्ती हा निधी आहे, मात्र तो देण्यामागे ज्यांचा भाव असतो तो ओळखणे महत्त्वाचे आहे.
• माझे ज्ञान जेव्हा दुसऱ्यांचे दुःख कमी करण्यासाठी उपयोगी पडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ज्ञानवंत झालो असे समजावे.

डॉ . पंडित विद्यासागर, कुलगुरू, मराठवाडा विद्यापीठ - प्रमुख पाहुणे २०१५

• ध्येय निश्चित करा, ध्येयावरून कधीही ढळू नका
• स्वयंशिस्त लावा त्यामुळे यश मिळेल. कष्ट करण्याची तयारी ठेवा
• संधी सांगून येत नाही त्यामुळे मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा.

डॉ . गिरीश कुलकर्णी, संस्थापक व अध्यक्ष, स्नेहालय, अहमदनगर - प्रमुख पाहुणे २०१५

• नागरिकांमध्ये सहयोगाची भावना निर्माण झाली पहिजे.
• मदतीसाठी मोठे होण्याची आवश्यकता नाही.
• प्रत्येक व्यक्तीने गरजवंतांना मदत केली पाहिजे, त्यामुळे समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.

डॉ.आनंद कर्वे, नामांकित वैज्ञानिक - प्रमुख पाहुणे, 2014

जगात जी नवकल्पना मांडली, ती भारताने मांडली आहे. त्यामुळे नवीन संशोधक वॄत्ती जोपासना, नवनिर्मिती व नवविचारांचा मार्ग पत्करा.

डॉ . सुनीलकुमार लवटे , संशोधक, लेखक व सामाजिक कार्यकर्ते - प्रमुख पाहुणे २०१४

• भारत पुढील काही वर्षात महासत्ता बनू शकतो. यासाठी तरुणांनी पुढे येउन योगदान देणे महत्त्वाचे आहे.
• भविष्यात गरजूंना शिष्यवृत्ती देण्याची क्षमता बाळगा. देश बलशाली बनवा.
• महान व्यक्तींच्या सान्निध्यात राहा. मिळालेल्या शिष्यवृत्तीचा उपयोग उत्तम करा.

डॉ.शंकर पुणतांबेकर, ज्येष्ठ साहित्यीक प्रमुख पाहुणे - 2013

शिंपल्यात पडणारा पाण्याचा थेंब मोती होतो आणि तोच थेंब सापाच्या तोंडात पडला तर त्याचे विष होते. याप्रमाणे दादांनी सुरु केलेल्या या योजनेतून शिष्यवॄत्ती प्राप्त केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचे मोती होणार.

डॉ.रघुनाथ माशेलकर, प्रसिध्द वैज्ञानिक - प्रमुख पाहुणे 2011

विद्यार्थ्यांनी यशाने हुरळून न जाता, प्रयत्नांची पराकाष्ठा करुन यशाचे शिखर गाठल्यास जळगावमधील व्यक्तीला नोबेल पारितोषिक मिळू शकते.

डॉ.नरेंद्र जाधव, सदस्य - नियोजन आयोग, भारत सरकार - प्रमुख पाहुणे 2010

तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते नक्कीच साध्य करार असा प्रचंड विश्वास तुमच्यामध्ये असायला हवा. परिश्रमाला पर्याय नाही. वेळेचे चांगल्या प्रकारे नियोजन करा. पालकांचा आदर करा. सामाजिक जबाबदारी लक्षात ठेवा व नेहमी सकारात्मक विचार करा.


लाभार्थींचॆ मनॊगत: 2019-2020 | 2018-2019 | 2017-2018 | 2016-17 | 2015-16 | 2014-15 | 2013-14 | 2012-13 | 2011-12 | 2010-11 | 2009-10