Beneficiary Log-in:    
१० वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन!: तुमच्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या यशाचा आलेख सतत वाढत जावो. 

लाभार्थी हिताचे कार्यक्रम

अ) गणवेश आणि पुस्तकांचे वाटप

 • पालकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यास मदत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकांचे वाटप करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समानतेची भावनादेखील निर्माण होते.

ब) बँक, सरकार आणि इतर योजनांमधून शैक्षणिक कर्ज

 • शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी काहीवेळा केवळ शैक्षणिक खर्च थोड्या प्रमाणात भागवू शकतात, परंतु उच्च शिक्षणासाठी आणि संबंधित कार्यासाठी त्यांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असते.
 • एसडी-सीडने बँक आणि आर्थिक संस्थांबरोबर करार केले आहेत, जे उच्च शिक्षणासाठी कर्ज वितरीत करतात.
 • ह्या करारामुळे विद्यार्थ्यांना कर्ज लवकर मिळण्यास मदत होते, कारण एसडी-सीडने अगोदरच विद्यार्थ्यांच्या विस्तृत माहितीची पडताळणी केली असल्यामुळे बँक/आर्थिक संस्था तीच माहिती त्यांच्याकडे घेते.
 • बँकेच्या / वित्तीय संस्थेच्या आवश्यकतेनुसार दस्तऐवजांची फॉर्म आणि यादी बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

क) इतर शहरांमधील हॉस्टेल्सची माहिती

 • जळगाव जिल्ह्याबाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरणात अभ्यास करता यावा म्हणून त्यांना उपयुक्त असा सुविधा असलेल्या इतर शहरांमधील हॉस्टेल्ससोबत सहकार्य करार करण्यात आले आहेत.
 • यामुळे विद्यार्थ्यांना एकत्र राहणे, अभ्यास करणे आणि एकत्र प्रवास करण्याचा लाभ मिळतो तसेच त्यांना जीवन-मैत्रीचे मित्र बनविण्यात मदत होते.

ड) विविध लायब्ररीजची माहिती

 • विद्यार्थ्यांना अभ्यास करतेवेळी पुस्तके, अहवाल, मॅन्युअल इ. चा संदर्भ घेणे आवश्यक असते जे फक्त लायब्ररीमध्ये उपलब्ध असतात.
 • या अनुषंगाने विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळण्यासाठी विविध लायब्ररीसोबत सहकार्य करार करण्यात आला आहे. ज्यामुळे त्यांना सवलतीचा दराने किंवा विनामूल्य लायब्ररीचे सदस्यत्व मिळण्यास मदत होते.

ई) क्लासेस, पुस्तके खरेदी, गणवेश, स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक सामग्रीसाठी सवलत सहाय्य

 • विद्यार्थ्यांना कोचिंग किंवा कॉम्पुटर क्लासेसमध्ये नोंदणी शुल्कात सवलत तसेच ग्रुपमध्ये प्रवेश घेतल्यास अधिकाधिक सवलत मिळावी यासाठी एसडी-सीडने संबंधित क्लासेससोबत साह्यकारी करार केले आहेत.
 • विद्यार्थ्यांना पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य, गणवेश इत्यादी सवलतीच्या दराने प्राप्त व्हावे यासाठी एसडी-सीडने घाऊक किंवा किरकोळ दुकानांसोबत सहकार्य करार केले आहेत. अशा सवलतींमुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होते.

फ) ज्ञान-यज्ञ (ई-न्यूजलेटर)

 • आमचे 'ज्ञान-यज्ञ' या नावाने प्रकाशित होणारे ई-न्यूजलेटर सर्व लाभार्थ्यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात येते. आजपर्यंत प्रकाशित झालेले सर्व ई-न्यूजलेटर आमच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे.
 • ई-न्यूजलेटरमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शनपर लेखांचा तसेच त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण कार्यक्रम, विविध सहाय्य योजना, प्रशस्तिपत्रे, हेल्थ टिप्स, शिक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी इत्यांदिचा समावेश असतो.

Back