Beneficiary Log-in:    
No News/ Info available.

आगामी नियोजित उपक्रम

विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांसोबत सहकार्य करार

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढवून त्यांच्या करिअर विकासास प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे./p>

शिक्षण मेळावा

भारतात आणि परदेशात अभ्यासासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शनासह त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

समर इंटर्नशिप

विद्यार्थी शिकत असलेल्या क्षेत्रात त्यांना कॉर्पोरेट किंवा व्यावसायिक जगतामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी संधी देणे ज्यामुळे त्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित होण्यास तसेच कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

प्लेसमेंट सेल

लाभार्थी आणि उद्योगातील नेटवर्कमध्ये व्यावसायिक प्लेसमेंट सेल स्थापित केला जाईल. लाभार्थ्यांचे बायो-डेटा विविध कंपन्यांमध्ये प्रसारित करण्यात येतील आणि त्यांच्याकडून लाभार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंटसाठी आमंत्रित करण्यात येईल. तसेच उद्योजकांसोबत सहकार्य करार करण्यात येईल ज्याद्वारे त्यांच्या उद्योगात आवश्यक असेल तेव्हा ते कुशल विद्यार्थ्यांना स्पॉन्सर्स करतील. जेणेकरून उद्योजक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जवळीक निर्माण होईल. असे विविध उपक्रम लाभार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आकांक्षा पूर्तीसाठी मदत करतील.

मेंटरींग

मेंटरींग म्हणजे सल्ला-मसलत ही विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्यातील थेट संबंध आहे जो कालांतराने विकसित होतो. ज्यांना सकारात्मक 'रोल मॉडेल्स'ची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सातत्याने समर्थन, मार्गदर्शन आणि सहाय्य्य प्रदान करतात. विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढविणे तसेच भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन करणे हे मेंटरींगचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनी हाती घेतलेले उपक्रम पूर्ण होण्यासाठी, त्यांच्यातील वैयक्तिक संबंध सुधारण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी आणि त्यांचे पुढील शिक्षण किंवा वर्कफोर्समध्ये बदल घडण्यासाठी मेंटरींगची फार मदत होते.

Back