Beneficiary Log-in:    
No News/ Info available.

मेंटरशिप प्रोग्राम

उद्दिष्टे:

  • लाभार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अडचणी, क्षमता आणि उद्दिष्टे लक्षात घेऊन वैयक्तिक मार्गदर्शन व आधार देणे तसेच रोजगारक्षमतेत वाढ करणे.
  • लाभार्थ्यांना व्यावसायिक नेटवर्क संधींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • लाभार्थ्यांना त्यांची नैसर्गिक प्रतिभा विकसित करण्यासाठी प्रेरणा व आधार देणे.
  • लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या करिअर संदर्भात निर्णय घेण्यास सक्षम करणे.

मार्गदर्शनाचा कालावधी:
मार्गदर्शन कार्यक्रम जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत एक वर्षासाठी चालतो.

मार्गदर्शनासाठी लाभार्थी अर्ज:
नूतनीकरण (Renewal) आणि नवीन (New) लाभार्थी कोणत्याही शाखेतील असू शकतात. शिष्यवृत्ती अर्जामध्ये त्यांना मार्गदर्शनाची गरज असल्यास नमूद करू शकतात.

मेंटर्स निवड निकष:

  • एसडी-सीड गव्हर्निंग बोर्ड आणि सल्लागार समितीचे सदस्य.
  • शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले विषयतज्ज्ञ.
  • शिक्षण, समाजकार्य किंवा समुपदेशन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेली व्यक्ती.
  • उत्कृष्ट संवाद कौशल्ये, मार्गदर्शनाची आवड व अनुभव असलेली व्यक्ती.
  • एसडी-सीड माजी विद्यार्थी (Alumni).
  • वरीलपैकी एक किंवा अधिक निकष पूर्ण करणारी आणि मार्गदर्शन कौशल्य असलेली कोणतीही व्यक्ती.

मेंटिज (लाभार्थी) यांच्या जबाबदाऱ्या:

  • नियुक्त मेंटर्सशी नियमित संवाद राखणे आणि त्यांचे मार्गदर्शन प्रामाणिकपणे पाळणे.
  • शैक्षणिक प्रगती, उपलब्धी व अडचणींबाबत नियमितपणे मेंटर्सना माहिती देणे.
  • कल्पना आणि अनुभवांच्या देवाणघेवाणीमध्ये मेंटर्ससोबत सक्रिय सहभाग घेणे.
  • एसडी-सीडद्वारे राबविलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमांत सहभागी होणे व त्याचा फायदा घेणे.
  • नेहमी आदरयुक्त व नम्र वर्तन मेंटर्सकडे दाखवणे.

अंमलबजावणी प्रक्रिया:
पहिला टप्पा : लाभार्थी निश्चित करणे (डिसेंबर महिना)

  • वार्षिक शिष्यवृत्ती अर्जामध्ये (नवीन व नूतनीकरण दोन्ही प्रकारचे लाभार्थी) मार्गदर्शन सहाय्याची निवड केलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे.
  • लाभार्थ्यांची माहिती अभ्यासक्रम व शाखेनुसार तयार करणे.

दुसरा टप्पा : प्रोजेक्ट लीडर मार्गदर्शन परिचय व मार्गदर्शक तत्त्वे

  • मेंटर्ससाठी परिचय सत्र आयोजित करणे ज्यामध्ये जबाबदाऱ्या, भूमिका, उत्तम पद्धती आणि नैतिक मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश असेल.
  • आचारसंहिता व गोपनीयतेच्या नियमांची माहिती देणे.

तिसरा टप्पा : लाभार्थी प्रोफाइलिंग आणि जुळवणी

  • मार्गदर्शन लाभार्थ्यांची सविस्तर माहिती अभ्यासक्रम व शाखेनुसार गोळा करणे.
  • लाभार्थ्यांचा मेंटर्ससोबत त्यांच्या शैक्षणिक शाखा व मेंटर्सच्या तज्ज्ञतेनुसार जुळवणी करणे.

चौथा टप्पा : मेंटर्स नियुक्त करणे (डिसेंबर महिना)

  • टीम लीडरने हे सुनिश्चित करणे की मेंटर्सना मार्गदर्शन, सहाय्य व सल्ला देण्यातील त्यांची भूमिका समजली आहे
  • शॉर्टलिस्ट केलेल्या मेंटर्स आणि लाभार्थ्यांची प्रोफाइल जुळवून योग्य मेंटर नेमणे.

पाचवा टप्पा : संवाद व्यवस्था

  • प्रत्येक मेंटर – लाभार्थी गटासाठी WhatsApp ग्रुप तयार करणे, ज्यायोगे नियमित अपडेट्स व गट संवाद होईल.
  • प्रत्येक मेंटर आणि लाभार्थी यांच्यात एक-ते-एक प्रारंभिक बैठक आयोजित करणे, ज्यामध्ये लाभार्थीची प्रोफाइल, आवडी, करिअर आकांक्षा आणि अडचणी यांवर चर्चा होईल.
  • संवादाची पद्धत आणि वारंवारता निश्चित करणे (उदा. साप्ताहिक, मासिक किंवा परस्पर सहमतीने).
  • संपर्क माहितीची देवाणघेवाण करणे आणि दोन्ही पक्ष संवादाच्या नियमांबद्दल समाधानी असल्याची खात्री करणे.

सहावा टप्पा : मेंटर सहकार्य व अहवाल

  • लाभार्थ्यांच्या अडचणींवर चर्चा करून उपायांची देवाणघेवाण करणे.
  • न सुटलेल्या समस्यांबाबत अहवाल देणे व एसडी-सीड बोर्डासोबत नियमित प्रगती अद्यतन (progress updates) शेअर करणे.
  • चर्चेतील मुद्दे व प्रगतीचे संक्षिप्त दस्तऐवजीकरण ठेवणे जेणेकरून पारदर्शकता राखली जाईल.

सातवा टप्पा : वार्षिक मार्गदर्शन उपक्रम आयोजित करणे (नोव्हेंबर)

  • वार्षिक शिष्यवृत्ती वितरण समारंभादरम्यान लाभार्थी व मुख्य पाहुणे यांची भेट आयोजित करणे.
  • लाभार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनातील अनुभव आणि शिकवणुक शेअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
  • मेंटर्सच्या योगदानाची दखल घेणे आणि लाभार्थ्यांची प्रगती व उपलब्धी सादर करणे.

एसडी-सीड मेंटोर  यादी

. क्र.

मेंटोरचे नाव

पद

श्री नंदलाल गादिया

संचालक - महावीर क्लासेस, जळगांव

प्रा. संजय दहाड

अधिष्ठाता - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव

. मीनाक्षी जैन

कार्यकारी अध्यक्षा - एसडी-सीड, जळगाव

डॉ.  एस.एस. राणे

माजी प्राचार्य - जी डी बेंडाळे महिला विद्यालय, जळगांव

डॉ. विवेक काटदरे

माजी प्राचार्य - आयएमआर कॉलेज व चार्टर्ड अकाउंटंट

प्रा. एस. व्ही. सोमवंशी

संचालक -  यशवंत अकादमी, जळगांव

प्रा. सुरेश पांडे

संचालक - पांडे क्लासेस – जळगांव

डॉ. शांताराम बडगुजर

सेक्रेटरी  - सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज (सीवायडीए), इंडिया

श्री. महेश गोरडे

संचालक - कुतुहल फाऊन्डेशन, जळगांव

१०

श्री. सागर पगारिया

सीएस आणि एलएलएम

११

डॉ. गौरी राणे

प्राचार्या - जी डी बेंडाळे महिला विद्यालय, जळगांव

१२

सौ. पुष्पा भंडारी

राईटर  

१३

श्री. जी. टी. महाजन

मास्टर ट्रेनर -  'यशदा' पुणे

१४

श्री. शिरीष बर्वे

आर्किटेक्ट

१५

श्री. उमेश सेठिया

संचालक - सॅन्ट्रॉनिक्स कॉम्पयुटर्स, जळगाव

१६

डॉ. डी. टी. नेहते

प्राध्यापक - एम जे. कॉलेज, जळगांव

१७

श्री. विक्रांत सराफ

संचालक - श्री मार्केटींग जळगाव

हेल्पलाईन क्रमांक : ०२५७-२२३५२५४ / ९३२५६८९२४४

Back