दत्तक शिष्यवृत्ती कार्यक्रम
तत्वज्ञान
- शिक्षण हे वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी मूलभूत व शक्तिशाली साधन आहे. तथापि, अनेक हुशार आणि शैक्षणिक प्रवृत्तीचे विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे आपले शिक्षण पुढे सुरु ठेवु शकत नाही.
- आमचे ध्येय म्हणजे विद्यार्थ्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि संधी यांतील दरी भरून काढण या हेतूने आम्ही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवतो, ज्यामुळे ते त्यांच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून आपले शिक्षण पूर्ण करू शकतो.
- आमची दत्तक शिष्यवृत्ती योजना या विश्वासावर आधारित आहे की आर्थिक अडथळ्यांमुळे कोणत्याही पात्र विद्यार्थ्याला त्याच्या शैक्षणिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यात अडथळा येऊ नये. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना शैक्षणिक सहाय्य प्रदान करणे
- आमचा विश्वास आहे की खरे सक्षमीकरण म्हणजे विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसोबतच अर्थपूर्ण जीवनासाठी तयार करणे. यासाठी आम्ही लक्ष केंद्रित प्रशिक्षण, मेंटॉरशिप आणि कौशल्य विकासावर भर देतो. या प्रक्रियेत सॉफ्ट स्किल्स, जीवन कौशल्ये, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता विषयक तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
आमचे प्रयत्न आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि भविष्याभिमुख विद्यार्थी घडविण्याकडे केंद्रित आहेत.
लाभार्थी दत्तक कार्यक्रम: आमची मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती ही एक लाभार्थी दत्तक योजना आहे. (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)
न्याय आणि गोपनीयता कायम ठेवण्यासाठी देणगीदार आणि विद्यार्थ्यांमधील थेट संपर्क प्रोत्साहित केला जात नाही. दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंद राखली जाते. आणि त्या वार्षिक प्रगती अहवालाची माहिती देणगीदारांना दिली जाते. दात्यांना पाठवला जातो. ज्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवास आणि प्रगती बाबत माहिती मिळते.
Empower Initiatives: सक्षमीकरण उपक्रमांमध्ये
प्रशिक्षण,
मार्गदर्शन,
इंटर्नशिप यांचा समावेश आहे. (अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा )
देणगी प्रक्रिया:
बँक खात्याचे तपशील:
खात्याचे नाव : Suresh Dada and Ratna Jain Foundation
खाते क्रमांक : 0482102000012917
बँक : IDBI Bank
शाखा : नेहरू चौक, जळगाव
IFSC कोड : IBKL0000482
विद्यार्थी दत्तक घेतांना वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):
प्र.१ विद्यार्थी दत्तक कार्यक्रम म्हणजे काय?
उत्तर- विद्यार्थी दत्तक योजना अंतर्गत एखादा व्यक्ती पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांचा शैक्षणिक प्रवास समर्थित करू शकतो. दाते खालील रकमेपैकी कोणतीही रक्कम दान करू शकतात — ₹ १0,000, ₹ १५,000, ₹ २५,000, ₹ ५0,000 किंवा ₹ १,00,000 आणि त्यापेक्षा जास्त.
विद्यार्थी निवड मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निवड निकषांनुसार केली जाते.
प्र.२. Empower Initiatives साठी मुख्य लक्ष केंद्रित क्षेत्र कोणते असावेत ?
उ. Empower Initiatives उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित आहे. त्यातील प्रमुख क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेत: सॉफ्ट स्किल प्रशिक्षण, मेंटॉरशिप, इंटर्नशिप संधी, आर्थिक साक्षरता, करिअर मार्गदर्शन, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे ज्ञान.
प्र.३. हे कार्यक्रम विद्यार्थ्यांना रोजगार आणि जीवन कौशल्यांसाठी कसे तयार करतात?
उ. हे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्ये आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करतात — ज्यामुळे ते त्यांच्या करिअरमध्ये तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी सक्षम बनतात.
प्र.४. विद्यार्थ्यांच्या विकासात मार्गदर्शन (मेंटॉरशिप) आणि इंटर्नशिपची भूमिका काय आहे?
उ. मार्गदर्शन (मेंटॉरशिप) विद्यार्थ्यांना योग्य दिशा, प्रेरणा आणि आधार प्रदान करते, तर इंटर्नशिप त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि वास्तव जगातील कौशल्ये शिकण्याची संधी देते.
प्र.५. या कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड किंवा नामांकन कसे केले जाते?
उ. विद्यार्थी मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती अर्ज भरताना एसडी-सीड (SD-SEED) मार्फत मेंटॉरशिप कार्यक्रमात सहभागी होणे किंवा इंटर्नशिपसाठी निवड होणे यापैकी पर्याय निवडू शकतात.
प्र.६. Adopt and Empower Initatives मध्ये कशाप्रकारे योगदान देऊ शकतात?
उ. Adopt and Empower Donation Form भरून आणि त्यांना कोणत्या उपक्रमासाठी योगदान द्यायचे आहे हे निवडून Adopt and Empower Initatives मध्ये आर्थिक मदत करू शकतात.
देणगी स्वीकारण्याची पद्धत:
• देणगी ऑनलाइन बँक ट्रान्सफर, क्यूआर कोड स्कॅन करून किंवा चेक / डीडी द्वारे स्वीकारली जाते.
बँक खात्याचे तपशील:
खात्याचे नाव : Suresh Dada and Ratna Jain Foundation
खाते क्रमांक : 0482102000012917
बँक : IDBI Bank
शाखा : नेहरू चौक शाखा, जळगाव
IFSC कोड : IBKL0000482
Back