Beneficiary Log-in:    
Google
त्वरा करा !: एसडी-सीड शिष्यवृत्ती २०२२ ऑनलाईन नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 

आमचे प्रशिक्षण कार्यक्रम

अ. करिअर मार्गदर्शन

करिअर मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडण्यासाठी, त्यांच्या क्षेत्रातील उपलब्ध करिअरच्या संधी जाणून घेण्यासाठी तसेच योग्य रोजगार मिळण्यास मदत होते.
दहावी व बारावीचे विद्यार्थी त्यांच्या करिअर निवडीबाबत फार संभ्रमावस्थेत असतात आणि यासाठी त्यांना करिअर सल्लागारांच्या मार्गदर्शनाची गरज असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता, बलस्थाने, दोष, आवड या सर्वांचा विचार करून त्यांना योग्य करिअर निवडण्यास आणि व्यवस्थित नियोजन करण्यास मदत होते.
आमच्या करिअर सल्लागारांची माहिती आणि विविध करिअर पर्याय असलेला चार्ट आमच्या वेबसाईटवर http://sdseed.in/Career/ या लिंकवर उपलब्ध आहे.

ब. विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम

इयत्ता आठवी व त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ज्याद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक व नैसर्गिक कल यांची तपासणी केली जाते. तसेच त्यांची बलस्थाने, उणिवा आणि आवड यांची माहिती जाणून घेतली जाते. यामुळे त्यांचे कौशल्य विकसित होण्यासाठी आणि संतुलित राहण्यासाठी तसेच पुढे योग्य करिअर निवडीसाठी या कार्यक्रमाची मदत होते.

क. स्पर्धात्मक आणि सार्वजनिक परीक्षांसाठी प्रशिक्षण

फीमध्ये सवलत मिळविण्यासाठी, स्पर्धात्मक आणि सार्वजनिक परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या कोचिंग क्लासेससोबत सहकार्य केले आहेत.
आमच्या वेबसाइटवर http://sdseed.in/Info/competitiveexams.asp या लिंकवर स्पर्धात्मक आणि सार्वजनिक परीक्षांची माहिती उपलब्ध आहे.

ड. प्रवेश प्रक्रिया माहिती

आमच्या वेबसाईटवर Knowledge Bank या लिंकवर विविध स्पर्धात्मक आणि सार्वजनिक परीक्षांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती उपलब्ध आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी कोणती परीक्षा लागू आहे याची माहिती देते.

इ. प्रतिष्ठित व्यक्तींकडून प्रेरणादायी भाषण

एक प्रतिष्ठित आणि यशस्वी व्यक्ती त्याने आत्मसात केलेल्या स्वभावगुणांमुळे जसे की, कठोर, परिश्रम, दृढनिश्चय आणि ध्येय निश्चित करून ते संपादन करणे यामुळे इतरांसाठी 'रोल मॉडेल' म्हणून प्रेरणास्थान असते.

या अनुषंगाने एसडी-सीड दरवर्षी शिष्यवृत्ती वितरण समारंभादरम्यान अशा योग्य 'रोल मॉडेल' व्यक्तिमत्त्वांना प्रमुख अतिथी तथा वक्ता म्हणून आमंत्रित करते. ज्यात ते विद्यार्थ्यांना आपण संघर्षांना कसे सामोरे गेलो, अडचणींवर कशी मात केली आणि अखेर यश कसे संपादन केले यासंबंधी त्यांचे अनुभव मांडून भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित करतात.

आजपर्यंत उपस्थित राहिलेल्या सर्व वक्त्यांची भाषणे एसडी-सीडच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या संदर्भासाठी अपलोड केले आहेत

फ. सॉफ्ट स्किल्स

सॉफ्ट स्किल्स म्हणजे वैयक्तिक गुणधर्म, वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमता. ज्यामुळे एखादी व्यक्ती इतरांशी कशी वर्तणूक करते हे ठरविले जाते. यांना 'पीपल स्किल्स' किंवा 'इंटरपर्सनल स्किल्स' असेही म्हणतात.
आमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ग्रामीण विभागातील असल्यामुळे त्यांना योग्य सॉफ्ट कौशल्याचे प्रशिक्षण आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना शहरी विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्यास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यास सक्षम बनविले जाईल.
सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षणामध्ये मुख्यत्वे करून गोल सेटिंग, बिझनेस एटीकेट, टाईम मॅनेजमेन्ट, इंटरव्हयू स्किल्स, बिझनेस रायटिंग, पब्लिक स्पिकिंग, ओरल इंग्लिश कम्युनिकेशन इत्यादी विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात येते.

ग. शिक्षकांना प्रशिक्षण

शिक्षकांना विविध शैक्षणिक तंत्रांवर आणि मूल्य आधारित शिकवण्याच्या शिक्षणावर प्रशिक्षण दिले जाते.

ज. पालकांचे समुपदेशन

पालकांचे खालील गोष्टींवर समुपदेशन करण्यात येते:

  • मुलांच्या असणाऱ्या महत्वाकांक्षेसमोर त्यांच्या काय गरजा तसेच अपेक्षा आहेत हे समजण्यासाठी
  • मुलांसाठी कोणते करिअर मार्ग उपलब्ध आहेत हे कळण्यासाठी
  • पालक-शिक्षक-विद्यार्थी यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावे यावर लक्ष केंदित करण्यासाठी

Back