Beneficiary Log-in:    
Google
स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा !: सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! एसडी-सीड शिष्यवृत्ती 2022 जाहीर: शिष्यवृत्ती- २०२२ जाहीर करताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. सन २०२१ चे लाभार्थी दि. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान www.sdseed.in द्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकतात. काही अडचण असल्यास एसडी-सीड कार्यालयास भेट द्यावी किंवा ०२५७-२२३५२५४ या क्रमांकावर संपर्क करावा. आपणास खूप शुभेच्छा. 

आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्री. सुरेशदादा जैन यांचा संदेश:


प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

मला विश्वास आहे कि, यापूर्वी इतके केव्हाही नव्हते तेवढे शिक्षणाला आज आपल्या जीवनात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील दोन दशकांमध्ये, जग फार झपाट्याने बदलले आहे. कोणत्याही क्षेत्रात किंवा ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर घडविण्याची इच्छा आहे त्यात यश संपादन करण्यासाठी ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील काही वर्षात आपणास जगात याहीपेक्षा अधिक नाट्यमय परिवर्तन झालेले दिसून येईल. त्यामुळे अशा स्पर्धात्मक आणि वेगाने विकसित होणाऱ्या जगात आपण कसे टिकून राहाल किंवा आपण कसे यशस्वी व्हाल?

माझ्या तरुण मित्रांनो, याचे उत्तर सोपे नाही, परंतु यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी करणे फार महत्त्वाच्या आहेत. प्रामुख्याने तुमच्यामध्ये ज्ञान मिळविण्याची प्रचंड तहान पाहिजे त्याचबरोबर, जिद्दीने, मेहनतीने व हुशारीने काम करण्याची तुमची तयारी पाहिजे. या व्यतिरिक्त, डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. त्याचसोबत नवनवीन कल्पना अवलंबणे आणि जुने विचार, जुनी तत्त्वे, पूर्वग्रहदूषित दृष्टी आणि वंश, जात आणि धर्मावर आधारित असलेला भेदभाव टाकून देणे देखील तितकेच आवश्यक आहे. मात्र आत्मविश्वास म्हणजे यशाचे गुपित आहे.

आपले पालक आणि शिक्षक देखील आपल्या कारकिर्दीत आणि जीवनात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मी त्या दोघांना आवाहन करतो, कि त्यांनी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे, जेणेकरून तुमच्यामधील नैसर्गिक प्रतिभांचा तुमच्या जीवनात फायदा होऊ शकेल.

मित्रांनो, मला विश्वास आहे कि तुमच्यामध्ये यशस्वी होण्याची तीव्र इच्छा आहे आणि त्या उद्देशामुळेच तुम्ही एस-सीडसह संलग्न झाला आहात. मला आपल्या नवीन पिढीवर पूर्ण विश्वास आहे कि, ते सर्व क्षेत्रात विजयी होतील आणि आपण एकत्रितपणे अधिक न्यायसंगत आणि संपन्न भारत घडवूया, ज्याचा आपणा सर्वांना अभिमान असेल.

जय हिंद!

श्री. सुरेशदादा जैन