Beneficiary Log-in:    
वार्षिक परिक्षेसाठी शुभेच्छा!: दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा!: सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा! 

स्मार्ट गर्ल कार्यक्रम

  • सामाजिक मतभेदांविरुद्ध लढण्यासाठी आणि कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी मुलींना मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी सशक्त करणे.
  • हा कार्यक्रम 15 ते 20 वर्षे वयोगटातील मुलींसाठी आयोजित केला जातो.
  • तरुण मुलींना प्रतिष्ठेचे जीवन जगण्यासाठी आणि प्रभावी जीवन कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून समान संधी गाठण्याच्या क्षमतेमध्ये सातत्याने वाढ व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • सामुदायिक नेटवर्कद्वारे मुलींच्या फायद्यासाठी मोड्युल विकसित करण्यासाठी स्मार्ट गर्ल कार्यक्रम हा एक सोपा उपक्रम आहे, परंतु आता त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे कि सर्व शाळेत जाणाऱ्या मुलींपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे.
  • या कार्यक्रमात 5 मॉड्यूलची (सेल्फ-अवेअरनेस, कम्युनिकेशन अँड रिलेशनशिप्स, सेल्फ-एस्टीम अँड सेल्फ-डिफेन्स, चॉइसेस अँड डिसीझन्स आणि फ्रेंड्स अँड टेम्पटेशन्स) विस्तृतपणे मांडणी करण्यात आली आहे. अतिरिक्त सहावा मॉड्यूल जो पालकांसाठी 90 मिनिटे आणि मुलींसाठी 30 मिनिटे हा देखील या कार्यक्रमाचा एक भाग आहे. ज्यामध्ये पालकांना मुलींच्या गरजा भागविण्यासंबंधी जाणीव करून देण्यात येते तसेच पालकांमध्ये आणि मुलींमध्ये चांगले नाते निर्माण व्हावे, त्यांनी एकत्रित वेळ घालवावा यासाठी प्रयत्न करण्यात येतो.

Back