Beneficiary Log-in:    
No News/ Info available.

संस्थॆची रचनाः

एसडी-सीड कार्यक्रमाच्या व्यवस्थापनॆसाठी व हा उपर्कम अत्यंत प्रभावीपणॆ पार पाडण्यासाठी स्वयंसॆवकांचा व व्यावसायिकांचा समावॆश असलॆली संस्थॆची रचना खालीलप्रमाणॆ:

गव्हर्निंग बोर्ड जबाबदारी
  • १) एसडी-सीडचे ध्येय साध्य करण्यासाठी कार्य करणे.
  • २) शिष्यवृत्ती, करिअर मार्गदर्शन, समर इंटर्नशिप, मेंटॉरशिप, प्रशिक्षण, उद्योजक विकास, स्मार्ट गर्ल, दत्तक कार्यक्रम इ. यासारख्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे.
  • ३) कार्यक्रमाचे नियमित पुनरावलोकन करून विद्यार्थ्यांच्या गरजानुसार त्यात सुधारणा करणे. तसेच सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा याची खात्री करणे.
सल्लागार समितीच्या जबाबदारी
  • १) गव्हर्निंग बोर्डला विद्यार्थ्यांच्या गरजांबद्दल सल्ला आणि मार्गदर्शन करून सर्व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत मदत करणे.
तालुका समन्वयक जबाबदारी
  • १) तालुका समन्वयक तालुका स्तरावर एसडी-सीडचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि एसडी-सीड व विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधतात.
  • २) ते विद्यार्थ्यांना एसडी-सीडच्या विविध कार्यक्रमांशी जोडून ठेवतात आणि विद्यार्थ्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये आवश्यक असल्यास बदल सुचवतात.
एसडी-सीड असोसिएट्सच्या जबाबदाऱ्या
  • १) एसडी-सिडच्या ध्येयपूर्तीसाठी सर्व कार्यक्रमांचे नियोजन करणे.
  • २) सर्व कार्यक्रमांची 100% अंमलबजावणी करणे.
  • ३) सर्व भागधारकांसोबत प्रभावी संवाद ठेवणे
  • ४) विविध कार्यक्रमांचे एसओपी, रेकॉर्ड, डेटाबेस अपडेट करणे.
लाभार्थी स्वयंसेवकांच्या जबाबदाऱ्या
  • १) एसडी-सीडच्या विविध कार्यक्रमांमध्ये समन्वय व व्यवस्थापन करण्यात लाभार्थी मदत करतात.
  • २) ते शिक्षण घेत असलेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन आणि शिकवण्यात वेळ देऊन मदत करतात.