Beneficiary Log-in:    
वार्षिक परिक्षेसाठी शुभेच्छा!: दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा!: सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा! 

आमच्या विषयी:

पार्श्वभूमी:

श्री सुरेशदादा जैन हे महाराष्ट्रातील जळगांव येथील सुविख्यात व्यक्तिमत्व आहे, ज्यांना सर्वजण आपुलकीने व प्रेमाने दादा असे संबोधतात. दादा मागील चार दशकांपासून राजकरण, शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी, आरोग्य, सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात लक्षणीय बदल घडविण्यासाठी अविरत कार्य करीत आहेत. दादांनी महाराष्ट्र विधानसभेच्या जळगांव मतदारसंघातून सतत नऊ वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यातूनच त्यांची प्रसिद्धी व जनमाणसांतील दादांविषयी असलेली श्रद्धा याचा अंदाज येतो. दादा एक अतिशय उत्साहवर्धक व्यक्ती आहे, तसेच सामान्य माणसांची सेवा करण्यात त्यांना दिलेल्या वचनबद्धतेशी ते फार आसक्त असतात. त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा वसा आपल्या आई वडिलांकडून घेतला. दादा एक असामान्य सार्वभौम नेते आहेत ज्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध संस्थांचे उत्कृष्टरित्या व परिणामकारक नेतृत्व केले आहे. एखाद्या समाज परिवर्तन कार्याची सुरुवात करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. ज्यांचे परिणाम आपल्याला सामाजिक बांधिलकी, शांतता तसेच स्थानिक क्षेत्रात झालेला विकास व प्रगती यांवरून दिसून येतात.


दादांची नेहमीच तळमळ आहे कि, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी उच्चशिक्षित व्हावे जेणे करून खऱ्या अर्थाने व्यक्ती-समाज-राष्ट्र असा समग्र विकास घडून येईल. आणि याच दिशेने पाऊल टाकत २००८ साली त्यांनी सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना म्हणजेच एसडी-सीड ही योजना सुरु केली. या योजनेद्वारे एसडी-सीड जिल्ह्यातील सर्व जाती, धर्म, पंथातील इयत्ता ८वी व त्यापुढील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

'मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती' हा एसडी-सीडचा प्रमुख कार्यक्रम आहे, ज्याद्वारे जळगाव जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु उत्तम शैक्षणिक क्षमता असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. तसेच यासोबत त्यांना विविध विद्यार्थी-केंद्रित लाभ देखील प्रदान केले जातात. हे सर्व कार्य 'सुरेशदादा अँड रत्ना जैन फाऊंडेशन' द्वारे प्रशासित करण्यात येते.


एसडी-सीडचे ध्येय:

'गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व उद्योजकीय कौशल्ये विकसित करून त्यांना जागतिक स्तरावर सक्षम बनविणे.'

एसडी-सीडची उद्दिष्ट्ये:

  • विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि परिणामाबद्दल प्रबोधन करणे.
  • सर्व पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक व उद्योजकीय ध्येय गाठण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • विद्यार्थी, पालक व शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी नवनवीन उपक्रम विकसित करून ते अंमलात आणणे.
  • सर्व उपक्रमांना स्वयंपूर्ण बनवणे, ज्यायोगे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांचा लाभ मिळेल.

एसडी-सीडच्या अध्यक्षा दादांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रत्ना जैन, प्रमुख मार्गदर्शन श्री. शांतीलाल मुथ्था (संस्थापक-भारतीय जैन संघटना), कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन आणि डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, अध्यक्ष-गव्हर्निंग बोर्ड ज्यामध्ये मार्गदर्शन व निवड समिती समाविष्ठ असलेल्या एकूण ३० प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांच्या द्वारे एसडी-सीडला योग्यरीत्या मार्गदर्शित करण्यात येते. निवड समिती शिष्यवृत्तीसाठी आलेल्या प्रत्येक अर्जाची सखोल छाननी करून अर्जदाराच्या पात्रतेची खात्री करते. वेळप्रसंगी त्याच्या निवासस्थानी जाऊन परिस्थितीची पाहणी करते व शेवटी शिष्यवृत्तीची रक्कम योग्य व लायक विध्यार्थ्यालाच मिळावी याची सुनिश्चीती करते.

एसडी-सीडने जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु उत्तम शैक्षणिक क्षमता असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना दीर्घकालीन लाभ मिळावेत यासाठी व्यापक स्तरावर कार्यक्रम बनविण्याचा निर्णय घेतला. जेणे करून शिष्यवृत्तीसोबत विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या गोष्टींची सांगड घातल्यास त्यांना एक परिपूर्ण पॅकेज उपलब्ध होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रोत्साहित होऊन या योजनेचा लाभ घेतील. परिणामस्वरूप सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल त्याचबरोबर ते यशस्वीरीत्या उद्योजक कौशल्ये आत्मसात करतील आणि जागतिक स्तरावर त्यांना रोजगार मिळू शकेल हा त्या व्यापक कार्यक्रमामागचा उद्देश आहे.

एसडी-सीडचे ध्येय व लाभार्थ्यांच्या गरजा लक्षात ठेवून एसडी-सीड सतत विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होते, ज्ञान वाढते आणि त्यांचा व त्यांच्या पालकांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटते आणि ते त्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करतात.