अंकित अशोक कांकरिया, जळगांव
माझ्या शैक्षणिक जीवनाला ज्यांनी आर्थिक सहाय्य करून ज्यांनी दिशा दिली अशा श्रीमती धापूबाई जैन चॅरिटेबल ट्रस्टला माझे शतशः धन्यवाद। माझ्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यात या स्कॉलरशिपची खुप मदत झाली. ट्रस्टचे सामाजिक कार्य खुप चांगले आहे. गरजू विद्यार्थ्यांना दादांनी व ट्रस्टने जी मदत केली आहे ती पाहून मला सुद्धा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्याबद्दल श्रीमती धापूबाई जैन चॅरीटेबल ट्रस्टचे पुनःश्च एकदा आभार.
अंकिता जयंत हातवळने, जामनेर
एस.डी.सीड. ची संकल्पना खुप छान आहे. अतिशय हुशार पण आर्थिक पाठबळ नसलेल्या विद्यार्थ्यांकरता ही एक चांगली संधी आहे. मी आणि माझ्यासारखे अनेक विद्यार्थी ज्यांना ही शिष्यवृत्ति मिळाली आहे, ते आपल्या जबाबदारीबद्दल नक्कीच जागरूक आहेत आणि भविष्यात नक्कीच इतरही विद्यार्थ्यांना मदत करू. धन्यवाद.
किरण शामराव बागुल, पाचोरा
प्रथम, धापूबाई जैन चॅरीटेबल ट्रस्टचे मी मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला ही शिष्यवृत्ति देऊन मला माझे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास व पूर्ण करण्यास मदत केली.
ट्रस्टकडून मिळणारी शिष्यवृत्तिची रक्कम जरी कमी असली तरी, ती शिष्यवृत्ति घेउन शिकताना मला नेहमी त्यामधून प्रेरणा, जिद्द, मिळाली. शिष्यवृत्तिच्या रकमेचे आपण सार्थक करावे म्हणून अभ्यासाची इच्छाशक्ति प्रबळ होत गेली व त्यामुळॆच आज मला चांगले यश मिळत आहे.
ट्रस्ट मधून आजपर्यंत फ़क्त आर्थिक मदतच मिळत नसून ट्रस्ट मार्फ़त होणा-या कार्यक्रमतुन सर्व विद्यार्थ्यामध्यॆ मदतीची, माणुसकिची, स्वावलंबपणाची, मूल्य रुजविली जात आहेत. म्हणून केवळ शिक्षित समाज न घडविता, ख-या अर्थाने 'सुशिक्षित' समाज घडविण्याचॆ कार्य ट्रस्ट मार्फत होतेय असे मला वाटते.
शेवटी, आज मे. सुरेश्दादांच्या प्रेरणा व आर्थिक मदतीतुन मिळणारी ही शिष्यवृत्ति योजना व ट्रस्ट पुढे एक स्वावलंबी ट्रस्ट व्हावी यासाठी मी म्हणेन की, केवळ, देणा-याने देत जावे व घेणा-याने घेत जावे.. एवढेच न करता प्रत्येक शिष्यवृत्ति धारकाने घेता घेता देणा-याचे हात घ्यावेत. म्हणजेच त्या हातांचा गुण नक्की घ्यावा.
प्रविण गॊकुळ विचवे, जळगाव
नमस्कार,
मी जळगाव येथे बांभोरी इंजिनीअरिंग कॉलेजला मॅकॆनिकल इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत असून मागील २ वर्षांपासून मला आपल्या ट्रस्टकडून शिष्यवृत्ति मिळत आहे, या शिष्यवृत्ति मुळॆच मी माझे डिग्री कोर्स पूर्ण करू शकणार आहे. मी एक अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून, माझे आई आणि वडिल दोघांचा स्वर्गवास झाला आहे. मी माझी आजी आणि लहान भाऊ यांच्यासोबत राहतो. लहानपणापासुनाच माझ्या आजीने माझे शिक्षण खुप कष्ट करून दिले आहे. सुरेशदादांनी माझ्या शिक्षणात लावलेल्या अमूल्य हातभाराने आम्हाला खुप मोठी मदत झाली. दादा आपल्या जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता खुप मोठे काम करत आहेत.
धन्यवाद
विजयराज पदमाकर पाटिल, चोपड़ा
मी सध्या एम्. एम्.सी.ओ.इ. पुणे येथे इंजिनीअरिंगच्या तीसऱ्या वर्षाला शिकत आहे. श्रीमती धापूबाई जैन ट्रस्टचा मीसुद्धा एक लाभार्थी आहे.
सर, मी खरच आपला खूप आभारी आहे की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ति देत आहात. अशाप्रकारे काम करणारी समाजात खूप कमी व्यक्ति आहेत. आपल्या द्वारे दिल्या जात असलेल्या या सहकार्याने मला माझे शिक्षण सुरळीतपणे पूर्ण करता येणार आहे.
मला म्हणावस वाटत की, ज्या दिशेने शिक्षण सुरु होते त्या प्रकारचे भविष्य माणुस साकारत असतो. म्हणुनच ही शिष्यवृत्ति विद्यार्थ्यांना एक दिशा देते आणि त्यांचे भविष्य उज्जवल करते.
धन्यवाद
|