लाभार्थींचॆ मनॊगत 2019-20:
Name: Chaudhari Gayatri Sunil माझी आई एका खाजगी दवाखान्यात काम करते. वडिलांचा अपघात झाल्यामुळे त्यांना काही काम नाही. अशातच मी दहावी चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर गुणवत्ता असूनही पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण जाणवत होती. या जगात देव अशा काही लोकांना मानवाच्या कल्याणासाठी पाठवितो की, ज्यामुळे कोमेजलेल्या पंखात बळ मिळते असेच बळ माझ्या पंखांना दिले ते मा. सुरेशदादा जैन यांच्या एसडी-सीड शिष्यावृत्तीने. त्यामुळे मला शालेय पुस्तके, स्टेशनरी, कॉलेजची फी भरण्याचा आधार मिळाला. तसेच पर्सनल कौन्सेलिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या तंज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनातून मला सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी आवश्यक सीईटी परीक्षेच्या अभ्यासाची दिशा मिळाली. त्यामुळे आज मला इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्गात चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळाला आहे. ईश्वर दादांना दीर्घायुष्य देवो व माझ्या सारख्या हजारो गरजू विद्यार्थ्यांना त्यांची छत्रछाया अशीच लाभो ही प्रार्थना करते.
Name: Ahire Dipali Siddharath माझे वडिलांचे असाध्य आजाराने निधन झाले. आई भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करून आम्हा चार बहिणींची जबाबदारी सांभाळत आहे. एसडी-सीडतर्फे मिळणाऱ्या शिष्यावृत्तीच्या मदतीने मा. दादा आमच्या पाठीशी जणू एका पित्यासारखे उभे आहेत यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे. एसडी-सीडने सुरु केलेल्या अभ्यासिकेत मला अल्प दरात प्रवेश मिळाल्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारीही जोमाने सुरु आहे. आणि मी पाहिलेले अधिकारी होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मा. दादांना दीर्घायुष्य लाभो आणि हे सत्कर्म असेच निरंतर चालू राहो हीच इच्छा व्यक्त करते.
Name: Annadate Saurabh Arun एसडी-सीड म्हणजे आमच्या सारख्या गुणवंत आणि आर्थिक कमकुवत विद्यार्थांची जीवनदायीनीच होय. मी एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थी. वडिलांना अर्धांगवायू आणि किडनीचा असाध्य आजार आणि अशातच आईवर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. या परिस्थितीशी संघर्ष करीत असतांनाच परिस्थितीवर मात करण्याचे बळ मिळाले ते एसडी-सीड शिष्यवृत्ती मुळेच. या शिष्यवृत्तीचा उपयोग मला माझे पुस्तके, आणि शालेयपयोगी साहित्य खरेदी करण्यामध्ये होत आहे. उद्योजकीय कौशल्य तसेच रोजगाराच्या संधी विकसित होण्यासाठी असलेल्या विविध योजना आमच्यात एक सकारात्मक प्रेरणा निर्माण करीत आहे.
Name: Borse Hemant Nandkumar मी मध्यमवर्गीय कुटुंबातील एका खेडेगावातील विद्यार्थी. वडील शेतमजूर आहेत. माझे सारखे हजारो विद्यार्थी एसडी-सीड शिष्यवृत्तीचा लाभ घेवून शिक्षण पूर्ण करत आहेत याचा खूप आनंद होतो. “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे” या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभवही आला. कारण एवढया मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सहकार्य फक्त माणुसकीच्या नात्याने होत आहे. एसडी-सीड मुळेच मला मानसिक, शैक्षणिक, आर्थिक मदत मिळत आहे याचा मला अभिमान आहे. ‘जेथे दिव्यत्वाची प्रचिती, तेथे कर माझे जुळती’. जेथे अज्ञानाचा अंध:कार दाटलाय तिथे ज्ञानाचा लख्ख प्रकाश पसरविण्यासाठी जी ज्ञानज्योत आपले प्रेरणास्थान मा. सुरेशदादा जैन व एसडी-सीड टीमने पेटविलीय त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो.
Name: Patil Bhavana Vikas एसडी-सीड खूप सुंदर उपक्रम असून यातून माझ्या सारख्या होतकरू मुलांना शिक्षणासाठी मदत आणि प्रेरणा मिळत आहे. आर्थिक अडचणींमुळे मेडिकल मध्ये करिअर ठरवतांना पाय थोडे डगमगले होते. एसडी-सीड शिष्यवृत्तीच्या मदतीने मी मेडिकलला प्रवेश घेतला. कारण माझे पाठीशी खंभीरपणे उभे होते मा. सुरेशदादा जैन. माझ्यासाठी ही शिष्यवृत्ती एक वरदानच ठरली आहे. मला पैसे नसतांना महागडी पुस्तके घेण्यासाठी, कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्या संकट समयी एसडी-सीड धावून आली. तेव्हा वाटल आपण एकटे नसून समाजात मा. दादांसारखे दातृत्व असणारे लोक आपल्या पाठीशी आहेत. एसडी-सीडचे आभार मानण्याची माझी पात्रता नाही, पण दादा खरच तुमचे खूप धन्यवाद! माझ्या कोमेजलेल्या पंखांना तुम्ही बळ दिले, जेणे करून ते पुढे आकाशात उंच भारती घेऊ शकतील.
Name: Patil Shrikrishna Sarangdhar मी उच्चशिक्षणासाठी खेडेगावातून जळगाव सारख्या शहरात शिकण्यासाठी आलो तेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक आर्थिक अडचणी आल्या. तशातच एसडी-सीडची शिष्यवृत्ती कल्पतरू सारखी माझ्या मदतीला धावून आली. त्यामुळे माझ्या आर्थिक अडचणी बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या. मलाच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांना मा. दादांच्या रुपाने एक स्वावलंबी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा सहवास आणि मदत लाभत आहे. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस एक नवीन दिशा मिळत आहे. त्यामुळे आम्हाला मा. दादांचा अभिमान वाटतो. दादा, जेव्हा मी तुमच्या आशिर्वादाने स्वावलंबी होईल, तेव्हा निदान पाच विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी यथार्थ मदतीचा हात देईन. |