लाभार्थींचॆ मनॊगत 2017-18:
Name: Maya Gokul Sonawane मी एक खेडेगावातील मुलगी. मुलगी म्हटले कि सर्व गोष्टींची बंधने येतात, दुय्यम वागणूक दिली जाते. माझे वडील शेतकरी असूनदेखील त्यांना शिक्षणाचे महत्त्व असल्यामुळे माझ्या शिक्षणाकडे ते दुर्लक्ष करीत नाही, पण उच्चशिक्षण म्हटले कि खर्च जास्त असल्यामुळे आर्थिक अडचण जाणवायला लागली. अशा वेळेस मा. सुरेशदादांनी एसडी-सीडच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा हात देऊन जणू शिक्षणाचा राजमार्गच माझ्यासाठी उघडा करून दिला. एसडी-सीडच्या या मदतीमुळे माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना ठरविलेल्या ध्येयापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तसेच त्यांच्या प्रेरणेने मलाही असे वाटते कि मीसुद्धा खूप यशस्वी व्हावे व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करावी म्हणजे त्यामुळे या उपक्रमाचे सार्थक होईल.
Name: Jayesh Shreeram Morankar या जगात देव अशा काही लोकांना मानवाच्या कल्याणासाठी समर्पित करतो कि ज्यामुळे कोमेजलेल्या पंखात बळ उभे राहते आणि पंख आकाशाच्या दिशेने झेप घेऊ लागतात. या पंखांना बळ देणारे आमचे मा. सुरेशदादा जैन. ज्यांच्या या एसडी-सीड उपक्रमातून माझ्यासारख्या कित्येक जणांना शिकून उत्तम व्यक्ती होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. माझ्यासाठी हि शिष्यवृत्ती तर एक वरदानच ठरली आहे. मला पैसे नसताना महागडी पुस्तके घेण्यासाठी, कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्या संकटसमयी एसडी-सीड धावून आली.तेव्हा वाटले कि आपण एकटे नाहीत. मा. दादांसारखे दानशूर, मोठ्या मनाचे, ज्यांना या समाजातील प्रत्येक विद्यार्थी पुढे जावा हि तळमळ आहे हे आपल्या पाठीशी आहेत. मी सुद्धा हा उपक्रम पुढे चालू राहावा म्हणून माझे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
Name: Prachi Subhash Patil मला मागील दोन वर्षांपासून एसडी-सीड शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे. मी डिप्लोमाला असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. घरात कोणीही कमावणारे नाही. सर्व जबाबदारी आईवरच आली. गुणवत्ता असूनही आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे निराशा आली. पुढचे शिक्षण कसे करावे हा मोठा प्रश्न मनात आला. अशातच एसडी-सीडची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मला शालेय पुस्तके, स्टेशनरी, कॉलेजची फी भरण्यासाठी आधार मिळाला. खऱ्या अर्थाने मला माझ्या आयुष्यात काही तरी मोठं बनण्याची प्रेरणा हि खरी एसडी-सीडमुळेच मिळाली आहे. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल मा. सुरेशदादांचे मी मनापासून आभार मानते आणि हा उपक्रम असाच सुरु राहावा, हि अपेक्षा बाळगते.
Name: Harshal Shantaram Bharule एसडी-सीडकडून मागील तीन वर्षांपासून मला शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे. हि माझ्यासाठी फक्त एक आर्थिक मदत नसून मला त्यातून एक प्रोत्साहन व शिक्षणाची दिशा मिळत आहे. माझी घरची परिस्थिती बेताची आहे. वडील हातमजुरी करतात तर आई दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुनी-भांडी करते. दहावी पास झाल्यावर पुढील करिअरचा प्रश्न मनात होता. शिवाय आर्थिक अडचण हि 'पाचवीलाच पुजलेली'. तशातच एसडी-सीड शिष्यवृत्तीबद्दल माहिती मिळाली आणि त्यासाठी अर्ज केला व गुणवत्तेच्या आधारावर शिष्यवृत्ती मिळाली. |
|