लाभार्थींचॆ मनॊगत 2014-15: Pramod Gopal Dhamale Dharangaon Manoj Devidas Sonar Pachora Harshal Ravindra Pawar Dharangaon Bharat Anil Chaudhari Bhusawal
Name: Revati Anil Joshi गेल्या पाच वर्षापासून मला या शिष्यवृत्तीचा लाभ होत आहे. ही शिष्यवृत्ती म्हणजे माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना एक कौतुकाची थाप आहे आणि यामागे जे आशीर्वाद आहेत ते म्हणजे मा. सुरेशदादांचे. दादांची ही विद्यार्थ्याप्रती असलेली आत्मीयता म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळालेले वरदानच आहे. शिक्षण घेत असताना काही गोष्टींच्या अभावामुळे अडचणी निर्माण होतात. त्यावेळी आपल्याला कोणीतरी सावरणारे आहे ही भावना फार आधार देवून जाते. आणि मला वाटते तो आधार या शिष्यवृत्तीमुळे आम्हा लाभार्थ्यांना मिळाला आहे. समाजात आमच्या प्रगतीची कोणीतरी दाखल घेत आहे हेच आमच्यासाठी सुखावह आहे.
Name: Mahesh Bhushan Agrani मी सन २०१२ पासून या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे. या शिष्यवृत्तीमुळे मी आणि माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना एक आशेचा किरण सापडला आहे. जीवनात एखादे चांगले काम करण्यासाठी प्रेरणेची गरज असते आणि मला शिक्षण घेण्यासाठी ही प्रेरणा मिळाली ती फक्त एसडी-सीड मुळेच. या मदतीमुळे मला शिक्षणात अग्रणी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या खानदेशचे नाव मोठे करण्याची एक प्रेरणा मिळाली. दादांच्या या योजनेमुळे आता गरीबातील गरीब मुलेही आपल्या शिक्षणापासून वंचित राहणार नाहींत. मी मिळालेल्या संधीचे सोने करीन आणि समाजाप्रती कृतज्ञ राहून कर्तव्यांचे पालन करीन अशी ग्वाही देतो. Name: Umesh Bapu Hatkar जसे एखाद्या पक्षाला उडण्यासाठी पंखांची गरज असते, तसेच एखाद्या गरीब विद्यार्थ्याला चांगले व उत्तम शिक्षण मिळण्यासाठी पैशांची गरज असते. आणि ती गरज माझी पूर्ण केली ती एसडी-सीडने. त्यांच्यामुळेच मला उच्च शिक्षण घेता आले म्हणून मी एसडी-सीडचे मन:पूर्वक आभार मानतो.
Name: Lalita Raghunath Bari एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीमुळेच मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले आणि माझी आज महाराष्ट्र पोलीस अंतर्गत जळगाव जिल्ह्यात महिला पोलीस म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे मी एसडी-सीडच्या सर्व मान्यवरांचे आभारी आहे.
Name: Vinayak Gangaram Nathjogi एसडी-सीड ही संस्था माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जी मदत करते त्यातून बराच आर्थिक तणाव कमी होतो आणि आपल्यामागे कोणीतरी उभे आहे, आपण अजून काहीतरी करूया, मोठे होवुया, जितकी शक्य तेवढी भरारी मारुया ही जिद्द मनात तयार होते. ही जिद्द निर्माण करण्यात एसडी-सीडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत. आम्हीही पुढे या समाजसेवेला नक्कीच हातभार लावू. पुन्हा एकदा आपले आभार मानतो. Name: Sachin Sanjay Khalase एसडी-सीड. जसे सीड म्हणजे बीजातून मोठे रोपटे तयार होते, त्याचप्रमाणे गरीबीतून विद्यार्थ्यांनी हे जग पाहायला पाहिजे हा या योजनेचा मुख्य अर्थ आहे. पुस्तकरूपी ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे व गरीब मुलांनी उद्योजक विकासाच्या दिशेने पोहोचले पाहिजे, हा खरा या योजनेचा उद्देश आहे. Name:Bharat Anil Chaudhari मी दहावीपासून एसडी-सीड शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे. मा. दादांनी ही योजना सुरु करून विद्यार्थ्यांच्या आर्थिक व शैक्षणिक खर्चाला खूप हातभार लावला आहे. जवळपास जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. शिष्यवृत्ती बरोबर उद्योजकीय विकास मार्गदर्शन व मोफत वैद्यकीय मदत देखील विद्यार्थ्यांना दिली जाते. मी भावी काळात एसडी-सीडचा सदस्य बनून माझ्या परी जी मदत करता येईल ती करू इछितो. मी मा. दादांचे आभार मानतो आणि ही योजना असेच कार्य करीत राहो, अशी त्यांना विनंती करतो. Name:Harshal Ravindra Pawar आजच्या युगात सत्य पण कटू गोष्ट म्हणजे भाऊ भावाला मदत करीत नाही. जर आपली अशी समजूत असेल की कोणी कोणाला मदत करीत नाही तर त्याला अपवाद आहे ते म्हणजे आपले दादा. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की एसडी-सीड ही जळगावातील मनापासून कार्य करणारी एक संस्था आहे. दहावीपासून मी यांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे. खरोखरच योग्य वेळी ही कामी येते आणि पैशांचे संकट दूर होते म्हणून फार आनंद होतो. ही शिष्यवृत्ती माझ्यासारख्या बऱ्याच गरजू मुलांची गरज भागवते. मी दादांचा खूप मनापासून आभारी आहे की दादांनी त्यांचा हात आमच्यासारख्या होतकरू विद्यार्थ्यांचा शिरावर ठेवला. त्यासाठी मी दादांचा सदैव आभारी असेन. Name:Manoj Devidas Sonar दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मी धावपळ करत होतो, पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे सार्वजण आर्ट्ससाठी प्रवेश घेण्यास सांगत होते. तेव्हाच मी एसडी-सीडची जाहिरात पाहिली, अर्ज केला आणि आजतागायत म्हणजे चार वर्षांपासून शिष्यवृत्ती घेत आहे. खरोखरच मा. सुरेशदादासाहेबांनी सुरु केलेले हे कार्य अतिशय वाखाणण्याजोगे आहे. मी आपणास सांगू इच्छितो की, माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या पगारातून जे काही मला देत येईल ते मी या संस्थेला देईल आणि एसडी-सीड सदस्य म्हणून कार्यरत होइल. पुन्हा एकदा आपल्या सर्व सदस्यांचे धन्यवाद. Name:Sagar Kailas Magare दहावीचा निकाल लागल्यानंतर मनात फार मोठे स्वप्न होते की आयुष्यात खूप सारे शिक्षण घेऊन सर्वांना त्याचा फायदा द्यावा. शिक्षण घेण्याची फार जिद्द होती, पण अडचण होती ती पैशांची. त्याच वेळेस मला एसडी-सीडबद्दल माहिती मिळाली. मला वाटले की सुरेशदादा एवढे मोठे व्यक्तिमत्व. त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी आपला नंबर लागेल का, पण त्यासाठी अर्ज भरला आणि एसडी-सीड शिष्यवृत्तीसाठी माझी निवड झाली. मला खूप आनंद झाला. त्यामुळे माझे स्वप्न पूर्ण होणार होते आणि जीवनात एक नवीन दिशा मिळाली होती. खरेच मला एसडी-सीडने आतापर्यंत जी मदत केली आहे, त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. Name:Sagar Sunil Patil दहावीपासून मला नियमितपणे एसडी-सीड शिष्यवृत्ती मिळत आहे. माझ्याकडे गुणवत्ता असताना आर्थिक बाबींची झळ यामुळे पुरेपूर प्रमाणात भरण्यात आली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे विद्यार्थ्याला ज्या ज्या गोष्टींना सामोरे जावे लागते त्या गोष्टींची मला पूर्णपणे जाणीव आहे. म्हणून भविष्यात माझ्याकडून गरीब व होतकरू मुलांना माझ्याकडून मदत होईल अशी इच्छा मी मनात बाळगतो. माझ्यासारख्या असंख्य मुलांना सुरेशदादांनी सुरु केलेल्या एसडी-सीड योजनेमुळे त्यांच्या पंखांना बळ मिळाले. यावरून दादांना विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी जाणवते. दादांच्या या योजनेमुळे एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या भविष्यास परीसस्पर्श झाला. मला मिळालेल्या लाभामुळे माझ्या शिक्षणात आर्थिक समस्या कधीच आड आली नाही. दादांच्या मदतीमुळे मी त्यांचा सदैव ऋणी राहील आणि त्यांच्यासारखेच सत्कर्म माझ्या हातून भविष्यात घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना. |
|