Beneficiary Log-in:    
नववर्षाच्या शुभेच्छा!: सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नाताळच्या शुभेच्छा!: सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! 

लाभार्थींचॆ मनॊगत २०१३-२०१४:

Name: Vaishali Jijabrao Mali
Beneficiary Code: 1112066275
Taluka: Chopda
Education in 2013-14: Mechanical Engineer (2nd Year)

एस-डीसीडमार्फत गरीब, होतकरू तसेच मेहनती विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती दिली जाते, ती अतिशय अभिमानास्पद बाब आहे. माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे मला माझे शिक्षण मध्येच थांबवावे लागले असते, पण एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीमुळे अभियांत्रिकी द्वीतिय वर्षाची फी भरू शकली. त्याबद्दल मी त्यांचे खूप ऋणी आहे. यामागे मा. सुरेशदादा यांचा फक्त एकच हेतू आहे की, गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेता आले पाहिजे, त्यांनी त्यांचे यश संपादन केले पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात 'आर्थिक परिस्थिती' हा अडथळा निर्माण होता कामा नये. यापुढेही त्यांनी अशा विद्यार्थ्यांना मदत करावी, हि विनंती. .

 


Name: Bhavesh Ashok Patil
Beneficiary Code: 1012018652
Taluka: Amalner
Education in 2013-14: Mechanical Engineer (2nd Year)

एसडी-सीडने दिलेल्या शिष्यवृत्तीच्या मदतीने मी टेक्निकल प्रोग्राम व काही ट्युशन लावू शकलो. तसेच त्या पैशांची मला काही इतर शैक्षणिक कामासाठीसुद्धा अत्यंत मदत झाली.

एसडी-सीड ही एक चांगली समाजसेवी संस्था असून याद्वारे कोणताही मतभेद न करता आर्थिक उत्पन्न आणि शैक्षणिक प्रगती या विद्यार्थ्यांच्या दोन्ही गोष्टी लक्षात घेवून शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. यामुळे अनेक विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती साधत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा याची मदत होत असल्यामुळे त्यांचा देखील विकास साधला जातो. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत एसडी-सीडचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.

 


Name: Vinay Sunil Sonawane
Beneficiary Code: 1011139059
Taluka: Parola
Education in 2013-14: B.E. Mechanical (3rd Year)

एसडी-सीडतर्फे राबविण्यात येणारा शिष्यवृत्ती उपक्रम हा जिल्ह्यातील अनेक गरजू व गुणी विद्यार्थ्यांना लाभदायक ठरला असून मी सुद्धा त्याचाच एक लाभार्थी आहे. या उपक्रमाद्वारे अनेक विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना मिळाली आहे व शैक्षणिक क्षेत्रातील आर्थिक अडचण यामुळे दूर झाली आहे. त्याबद्दल मी या संस्थेचा अत्यंत ऋणी आहे.




Name: Manoj Devidas Sonar
Beneficiary Code: 1011129480
Taluka: Pachora
Education in 2013-14: Diploma (3rd Year)

एसडी-सीडतर्फे मला मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्ती प्रदान होत आहे. ते करीत असलेल्या या महान कार्याबद्दल प्रथमतः धन्यवाद.

माझे शिक्षण पूर्ण झाल्यास मीही एसडी-सीडचा सदस्य होवून माझ्यासारख्या अत्यंत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करीन व एसडी-सीडच्या कार्यात सदैव तत्पर राहीन, अशी ग्वाही देतो. आपण करीत असलेल्या या कार्याबद्दल पुन्हा आपले शतशः आभार.


Name: Jagruti Sanjay Chaudhari
Beneficiary Code: 1112059022
Taluka: Chalisgaon
Education in 2013-14: BCA (1st Year)

सर्वप्रथम मी एसडी-सीडचे आभार मानते की, ज्यांनी 'ज्ञानगंगेचे अमृत' पिण्याची संधी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली.

ही एक चांगली योजना आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे काही स्वप्न असते, त्या स्वप्नाला प्रेरणा देण्याचे उत्कृष्ट कार्य ही संस्था करते. एसडी-सीडतर्फे विद्यार्थीहिताच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन मिळते. एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थांना प्रोत्साहन मिळते व जास्तीत जास्त मार्क्स मिळविण्याची जिद्द व उमेद वाढते.

विद्यार्थ्याने खऱ्या अर्थाने मदत करणाऱ्या व अनाथांचे अश्रु पुसणाऱ्या 'एसडी-सीड'चे आभार मानते.

Name: Nilesh Ravindranath Kasar
Beneficiary Code: 1011139735
Taluka: Parola
Education in 2013-14: B.Tech. (4th Year)

मी गत तीन वर्षांपासून मातोश्री श्रीमती प्रेमाबाई भिकमचंद जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती म्हणजेच एसडी-सीडचा लाभार्थी असून या शिष्यवृत्तीपासून काही प्रमाणात का असेना शिक्षणास हातभार लागत आहे.

उच्च तांत्रिक शिक्षण घेताना पुण्यासारख्या मेट्रोपॉलीटन शहरात सर्वसामान्य कुटुंबातून येवून शिक्षण पूर्ण करणे खूपच जिकीरीचे आहे. यासाठी लागणारे आर्थिक खर्च पालकांनी पुरविल्याशिवाय शिक्षण पूर्ण करणे अवघडच असते. म्हणून तुम्ही गेल्या तीन वर्षांपासून मला करीत असलेल्या मदतीबद्दल मी स्वतः व माझे पालक आपले सदैव ऋणी राहू.

आदरणीय दादासाहेब व त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर सुखी, समाधानी, दीर्घायुष्य देवो, ही प्रार्थना. धन्यवाद.

Name: Mamlesh Bansilal Kotwal
Beneficiary Code: 1012079173
Taluka: Dharangaon
Education in 2013-14: ITI (3rd Year)

एसडी-सीडद्वारे शिष्यवृत्ती देवून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या आदरणीय सुरेशदादा व त्यांच्या सहकाऱ्यांना त्रिवार प्रणाम.

माझ्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे मला दहावीत चांगले गुण मिळूनसुद्धा पैशाअभावी मी अकरावीत प्रवेश घेवू शकलो नाही व आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. नंतर मला मित्राद्वारे या शिष्य्वृत्तीबद्दल कळाले व मला एसडी-सीडकडून शिष्वृत्ती मिळाली आणि आम्ही आमच्या नातेवाईकांकडून जे उसने पैसे घेतले होते ते गर्वाने परत केले.

माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्याला एसडी-सीडने जी काही मदत केली आहे ती माझ्यासाठी एक मोठी लाखाची गोष्ट आहे.

Name: Gitesh Vinodkumar Ostwal
Beneficiary Code: 1011077990
Taluka: Dharangaon
Education in 2013-14: B.Pharm. (4th Year)

माझी घरची परिस्थिती नाजूक असल्याकारणाने शिक्षण पूर्ण होईल का याचा मी विचार करीत होतो. पण जेव्हा मला एसडी-सीडच्या शिष्य्वृत्तीबद्दल कळाले तेव्हा मला माझ्या शिक्षणासाठी आशेचा किरण दिसला.

आपल्या योजनेने माझ्या शिक्षणात सिंहाचा वाटा उचलला आहे. यावर्षी माझे शिक्षण पूर्ण होईल आणि मी माझ्या समाजाच्या/देशाच्या काही उपयोगी पडण्यालायक होईल. याचे श्रेय मी माझ्या कुटुंबाला आणि आपल्या या योजनेला अर्थातच श्रीमान सुरेशदादा जैन यांना देवू शकेल.
लाभार्थींचॆ मनॊगत: 2023-2024 |2022-2023 |2020-2021 |2019-2020 | 2018-2019 | 2017-2018 | 2016-17 | 2015-16 | 2014-15 | 2013-14 | 2012-13 | 2011-12 | 2010-11 | 2009-10