लाभार्थींचॆ मनॊगत 2015-16:
Name: Tejaswini Lalit Patil माझे वडील शेतमजूर असल्यामुळे त्यांना माझ्या व माझ्या भावांचा खर्च पेलवत नाही. असंख्य अडचणींचा आम्हाला सामना करावा लागतो. आम्हाला शिकण्याची खूप इच्छा आहे. या आमच्या इच्छा आणि ध्येयापर्यंत पोहचविण्यासाठी एसडी-सीडची हि शिष्यवृत्ती म्हणजे बुडत्याला काठीचा आधार अहे. हि शिष्यवृत्ती मिळाल्याचा खूप आनंद , कारण यामुळे माझ्या वडिलांच्या डोक्यावरील पैशांचे ओझे कमी झाले व मला शिकण्याची नवी उमेद व प्रेरणा मिळाली. मी सदैव एसडी-सीडची ॠणी राहील.
Name: Pankaj Shrikant Shinde Name: Gayatri Hari Patil एसडी-सीडमार्फत माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे, याचा मला आनंद आहे. समाजात इतरांकडून घेणारे लोक प्रत्येक ठिकाणी दिसतील, पण इतरांना देणारे लोक मात्र क्वचितच भेटतील. याचेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे एसडी-सीड होय. शैक्षणिक क्षेत्रात असंख्य अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळेस एसडी-सीडची शिष्यवृत्ती मदत आणि आमच्यासाठी राबविलेले विविध उपक्रम आमचा आत्मविश्वास बळकट करीत असतो.
Name: Amol Rajendra Pingale जेव्हा स्वप्नांच्या आकाशात भरारी घ्यायची असते तेव्हा गरज असते ती कोणाच्या तरी मदतीची. आमच्यासारख्या गरीब, गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या निवारण्यासाठी एसडी-सीडकडून केले जाणारे कार्य आणि मदत ही नक्कीच अभिनंदनीय आहे. आज शिक्षण हे स्वस्त नाही आणि ते माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलांना शक्यही नाही. अशा परिस्थितीत आम्हाला शिक्षणाची दारे पुन्हा उघडी झालेली आहेत ती म्हणजे फक्त एसडी-सीडमुळेच. मा. दादांच्या प्रेरणेने एसडी-सीडमार्फत आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा प्रकाश किरण उगवला आहे.
Name: Sagar Kailas Magare Name: Revati Anil Joshi एसडी-सीडची शिस्यावृत्ती म्हणजे माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना मिळालेली एक थाप आहे. आणि यामागे जे आशीर्वाद आहेत ते म्हणजे मा. सुरेशदादांचे. दादांची हि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांना मिळालेले वरदानच आहे. शिक्षण घेत असताना काही गोष्टींच्या अभावामुळे अडचणी निर्माण होतात. त्यावेळी आपल्याला सावरणारे कोणीतरी आहे हि भावनाच फार आधार देऊन जाते. आणि मला वाटते तो आधार या शिष्यवृत्तीमुळे आम्हा लाभार्थ्यांना मिळाला आहे. समाजात आमच्या प्रगतीची कोणीतरी दखल घेत आहे हेच आमच्यासाठी फार सुखावह आहे Name: Manoj Devidas Sonar |
|