लाभार्थींचॆ मनॊगत 2020-21:
Name: Patil Ajaysing Abhaysing सर्वप्रथम एसडी-सीडचे सहकार्य लाभत आहे त्याबद्दल आभार. माझी घरची परिस्थिती अतिशय नाजूक असून वडील हातमजुरी करतात त्यामुळे शिक्षण घेतांना अनेक आर्थिक अडचणी येत होत्या. त्या एसडी-सीड च्या शिष्यवृत्तीने कमी झाल्या. यातून मला आर्थिक मदत तर होतेच आहे पण शिक्षण घेतांना एक प्रोत्साहन आणि दिशा मिळत आहे. मलाच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांना मा. सुरेशदादांच्या सुपाने एक स्वावलंबी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा सहवास लाभत आहे. खेडेगावातील तरुणांना त्याच्यातील कौशल्यांच्या विकास होणेसाठी एसडी-सीडचे सहकार्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून लाभत आहे. त्याचाच परिपाक म्हणून राज्य स्तरीय फेस्टिवल ऑफ फ्युचर या सारख्या स्पर्धा व इतरही अनेक उद्योजकीय आकाक्षांना भर देणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी आणि पारितोषिक मिळविण्याची संधी आणि प्रोत्साहन मिळाले ते फक्त एसडी-सीड मुळेच.
Name: Chaudhari Poonam Ramakant मी पूनम चौधरी गेल्या तीन वर्षांपासून एसडी-सीड ची शिष्यवृत्ती नियमित घेत आहे. घरची परिस्थिती जेमतेम आहे. खरोखर एक गोष्ट अभिमानाने सांगावीशी वाटत आहे की माणूस जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला देव आठवतो. पण देव आठवण्यापेक्षा देव भेटणे महत्वाचे आहे. आणि तोच मदतीला धावून येणारा देव मला दादांमध्ये दिसलाय. परिस्थिती कशीही असली तरी ती शिक्षणाच्या आड येत नाही काही तरी नवीन मार्ग निघतोच. तसाच एक आशेचा किरण माझ्या आयुष्यात आला तो एसडी-सीड च्या रूपाने. या शिष्यावृत्तीने माझ्या शिक्षणातील अडसर दूर झाला. मा. सुरेशदादा जैन यांच्या या उद्दात्त कल्पनेतून या शिष्यवृत्तीचा उगम झाला आणि माझ्या सारखे अनेक तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची एक नवी दिशा मिळत आहे. घरची परिस्थिती साधारण असूनही आमच्या स्वप्नांना भरारी घ्यायला बळ मिळत आहे. आज मी बी.टेकच्या अंतिम वर्षाला शिकत असून मा. दादांच्या प्रेरणेतूनच तृतीय वर्षाला महाविद्यालयातून प्रथम आली. तसेच राज्य स्तरीय टेक्निकल स्पर्धा “TELETRONIXX 2K19” मध्ये द्वितीय क्रमान मिळविला.
Name: Jain Ritik Shikhar मी रितीक जैन बी फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. “शिक्षण” हे एक प्रभावी अस्त्र असते हे माहित असूनही आर्थिक अडचणीमुळे शिक्षण पूर्ण करता येईल की नाही याची भीती वाटत होती. कारण वडील कापड दुकानात कामाला आणि मला उच्चशिक्षणासाठी शिरपूर येथे जायचे असल्यामुळे प्रामुख्याने कॉलेजची फी भरणे, नवीन पुस्तके विकत घेणे अशा अनेक अडचणी समोर होत्या. त्या एसडी-सीड शिष्यवृत्तीमुळे कमी होऊन माझ्या कोमेजलेल्या पंखांना बळ, प्रोत्साहन व दिशा मिळाली. आज मी माझे शिक्षण निर्विघ्नपणे घेत असून विविध रिसर्च वर्क करीत आहे. नुकतेच मला अहिंसा इन्स्टीट्युट ऑफ फार्मसीद्वारे “बेस्ट रिसर्च स्कॉलर अवार्ड” ने सन्मानित करण्यात आले आहे. हे सर्व शक्य झाले ते एसडी-सीडच्या आधारानेच. स्वप्नातील “हिरो” हा काल्पनिक असतो परंतु आदरणीय दादा आमचे जीवनातील खरे “हिरो” आहेत. अशा आमच्या खऱ्या हिरोला दीर्घायुष्य लाभो आणि हे सत्कर्म त्यांच्या हातून असेच निरंतर चालू राहो हीच इच्छा व्यक्त करतो.
Name: Patil Vaishnavi Dilip मी दहावीला ९१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. आई-वडील शेतकरी असून निसर्गाने साथ दिली तर आर्थिक घडी बसते नाहीतर सर्व विस्कटलेले असते. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेणे म्हणजे खूप कठीण होते परंतु मा. सुरेशदादांनी सुरु केलेल्या शिष्यवृत्तीमुळे मी पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त झाले. मला पुढे जाऊन मेडिकलला प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठी मी सायन्सला प्रवेश घेतला असून अकरावी सायन्सच्या अभ्यासात एसडी-सीड मार्फत केल्या जाणाऱ्या वैयक्तिक समुपदेशनच्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा लाभ मी नियमित घेणारच आहे. या स्पर्धात्मक जगात आपण टिकून राहू शकतो तसेच मी ठरविलेले ध्येय नक्कीच साध्य करेल असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मा. सुरेशदादा जैन यांनी सुरु केलेला हा उपक्रम अतिशय चांगला असून मा. दादांचे मन:पूर्वक धन्यवाद आणि केलेल्या आर्थिक सहाय्यासाठी मनापासून आभार. |
|