Beneficiary Log-in:    
No News/ Info available.

लाभार्थींचॆ मनॊगत 2023-24:

कादंबरी राजेंद्र गावंडे
तालुका जळगाव
शिक्षण: एम.बी.ए. फायनान्स (द्वितीय वर्ष)

मी एका खेडेगावातील सामान्य कुटुंबातील असून आई-वडील शेतात मजुरी करतात. एसडी-सीड म्हणजे माझ्या सारख्या विद्यार्थ्यांची जीवनदायीनीच आहे. परिस्थिती शिक्षणाच्या आड येत नाही त्यावर मात करता येते ही सकारात्मक प्रेरणा एसडी-सीड मुळे माझ्यात निर्माण झाली आहे. त्याच्या बळावर मी आज एम.बी.ए.च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. मी आदरणीय सुरेशदादा जैन यांचे खूप मनापासून आभार मानू इच्छिते कारण दादांनी विद्यार्थ्यांप्रती असलेल्या दूरदृष्टीतून एसडी-सीड हे एक उत्तम दर्जाचे संस्थान सुरु केले. त्यातून माझे सारखे देशाचे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडत आहे. आमच्या सारख्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा मा. दादांनी जो विडा उचलला आहे तो पूर्णत्वास जावो आणि त्यांनी बघितलेले उज्ज्वल भारताचे स्वप्न आम्ही विद्यार्थी नक्की पूर्ण करणार अशी ग्वाही देते.


राहुल सुधाकर अत्तरदे
तालुका जळगाव
शिक्षण: बी. ई. कॉम्पुटर (चतुर्थ वर्ष)

मी लहान असतांना वडिलांचे छत्र हरविले. आई हातमजुरी करत असून माझी घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. एसडी-सीड शिष्यवृत्तीच्या मदतीने मी आज बी.ई. कॉम्पुटरच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे. मी दहावी उत्तीर्ण झाल्यावर शिक्षण सोडून आईला हातभार म्हणून मजुरीचे काम करेल असे ठरविले होते. अशा मनस्थितीत असतांना गुणवत्तेच्या आधारावर एसडी-सीड शिष्यवृत्तीसाठी मी पात्र ठरलो. माझा सर्व खर्च मी यातून पूर्ण करत आहे. तृतीय वर्षाला शिक्षण घेत असतांना एसडी-सीड कडून नामांकित कंपनीत मला इंटर्नशिपची संधी मिळाली. माझ्या सारख्या अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे फार मोलाची मदत मिळत आहे. एसडी-सीडच्या मातृत्वरूपी मदतीला माझा सलाम आणि मी सदैव एसडी-सीडच्या ऋणात राहू इच्छितो.


मीनाक्षी प्रविण शिवपूजे
तालुका भुसावळ
शिक्षण : बी. टेक. फूड टेक्नोलॉजी (चतुर्थ वर्ष)

मी बी.टेक. फूड टेक्नोलॉजीच्या चौथ्या वर्षाला शिकत आहे. मी सातवीत असतांना वडिलांचे छत्र हरविले. आईने मजुरी, धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. या शिष्यवृत्तीमुळे माझ्या पंखांना बळ मिळाले आहे. आमचे आ. सुरेशदादा जैन यांच्या एसडी-सीडमुळे मी माझे ध्येय नक्कीच पूर्ण करू शकते याची खात्री आहे. आपण एकटे नाहीत तर दादांसारखं दातृत्व असलेले उदार मनाचे दानशूर आजही समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना मदत करीत आहेत यामुळे एक मानसिक आधार मिळतो. हा उपक्रम असाच सुरु रहावा हीच इच्छा व्यक्त करते आणि मा. दादांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. मी सुद्धा हा उपक्रम पुढे चालू रहावा म्हणून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावर माझ्याने जेवढी शक्य होईल तेवढी मदत करेल.


मनोहर रवींद्र पाटील
तालुका धरणगाव
शिक्षण : बीएएमएस (प्रथम वर्ष)

मी लहान असतांनाच माझ्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असून आई रोजंदारीने शेतात काम करते व त्यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. जेव्हा आपल्यावर संकटे येतात अशा समयी ती निवारण्यासाठी परमेश्वर कोणाच्या तरी माध्यमातून त्यांना दूर करण्यासाठी मार्ग दाखवितो. मला सांगतांना अतिशय आनंद होत आहे की, एसडी-सीड शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आदरणीय सुरेशदादा जैन यांच्या रूपाने परमेश्वराने मला तो मार्ग दाखविला आहे. त्यातूनच मला शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत आहे. आदरणीय सुरेशदादा यांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या दूरदृष्टीतून मी नक्कीच एक चांगला डॉक्टर होईल असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मा. दादांच्या रूपाने मला वडिलांचे छत्र लाभले असून ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना करतो.


लाभार्थींचॆ मनॊगत: 2023-2024 |2022-2023 |2020-2021 |2019-2020 | 2018-2019 | 2017-2018 | 2016-17 | 2015-16 | 2014-15 | 2013-14 | 2012-13 | 2011-12 | 2010-11 | 2009-10