लाभार्थींचॆ मनॊगत 2022-23:
Name: तायडे प्रेरणा संजय - भुसावळ - मी प्रेरणा संजय तायडे मेडिकलच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. माझे वडील हात मजुरी करतात. आर्थिक परिस्थिती बिकट आहे. माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होईल की नाही याची भीती वाटत होती. परंतु मा. सुरेशदादा जैन यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या एसडी-सीडमुळे मला फार मोठा आर्थिक आधार मिळाला. त्यामुळेच मेडिकलसाठी प्रवेशही घेता आला.
Name: अहिरे योगिता सिद्धार्थ - जळगाव - मी लहान असतांनाच वडिलांचे छत्र हरपले. आई हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. या शिष्यवृत्तीमुळे माझ्या उच्चशिक्षणाच्या स्वप्नांना एक आधार मिळाला. आता कोणत्याही आर्थिक अडचणीची भीती वाटत नाही. चांगला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. शिक्षणाची जिद्द असलेल्या आम्हा विद्यार्थ्यांना आता नवी दिशा मिळाली आहे.
Name: खेंटे शुभम सुनील - जळगाव - शिक्षण घेत असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीपुढे हतबल व्हावे लागते तर कित्येक मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशीच काहीशी परिस्थिती माझी होती. लहान असतांना वडिलांचे निधन झाल्याने आईने दवाखान्यात काम करून आमचा सांभाळ केला. डोळ्यांसमोर सर्वत्र अंधार असतांना आ. सुरेशदादा जैन यांच्या माध्यमातून एसडी-सीडच्या रूपाने एक दीप प्रज्वलित झाला व त्यामुळे मला शिक्षण घेण्यासाठी नवी दिशा मिळाली.मी शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी झाल्यावर मा. दादांची देण्याची वृत्तीचा अंगीकार करून अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी यथार्थ मदतीचा हात देईल.
Name:मराठे भूषण आत्माराम - धरणगाव - मी सध्या डिप्लोमा कॉम्पुटरच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असून वडील शेतमजुरी करतात. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना एसडी-सीडची शिष्यवृत्ती कल्पतरू सारखी माझ्या मदतीला धावून आली. मलाच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांना समाजातील प्रत्येक क्षेत्रातील पोकळी भरून काढण्याची क्षमता असणार्या मा. दादांच्या रूपाने प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा सहवास आणि मदत मिळत आहे याचा आनंद वाटतो. एसडी-सीडच्या मदतीने कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय खेडेगावातील सामान्य विद्यार्थी शहरात शिक्षण घेऊ शकतो हे सिद्ध झाले. आपण माझ्या पंखांना बळ दिलेत त्यामुळे मुक्त आकाशात उंच भरारी घेण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला. मा. दादांना दीर्घायुष्य लाभो आणि हे सत्कर्म असेच निरंतर चालू राहो हीच इच्छा व्यक्त करतो. |
|