लाभार्थींचॆ मनॊगत 2018-19:
Name: Bharude Shrikrishna Dilip सर्वप्रथम मी मा. सुरेशदादांचे मनःपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी सुरु केलेल्या एसडी-सीडद्वारे मला शिष्यवृत्तीचा लाभ झाला आणि त्यामुळे मी पुढे शिक्षण घेऊ शकलो. माझ्यासारखे बरेच विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि असे विद्यार्थी एसडी-सीडच्या मदतीमुळे आपले शिक्षण पूर्ण करतात. मा. सुरेशदादांसारखे असे काही थोरच माणसे जन्माला येतात, जे तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याच्या संदर्भात मदत करतात. मी देखील माझ्या पायावर उभा राहीन तेव्हा माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत करीन. मा. दादांची ही दान करण्याची वृत्ती खरोखरच खूप चांगली आहे. यासाठी मी त्यांचे मनस्वी आभार मानतो.
Name: Thuse Devendra Vinayak एसडी-सीड शिष्यवृत्तीमुळे मला जी आर्थिक मदत मिळाली ती माझ्यासाठी फार महत्वाची आहे, पण त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे मला मिळालेला मानसिक आधार. एसडी-सीडमुळे मला जाणीव झाली कि समाजात असेही लोक आहेत जे स्वतःच्या व्यतिरिक्त इतर समाजाचाही विचार करतात आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नही करतात. मागील दोन वर्षांपासून मी या शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे. एसडी-सीडचे कार्य पाहून मलाही समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि आर्थिकरित्या स्वावलंबी झाल्यावर मी देखील एसडी-सीड योजनेत भाग घेईन.
Name: Sakhalkar Aarti Sanjay माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने शिक्षणात अनेक अडचणींना मला सामोरे जावे लागते. तसेच पितृछत्र नसल्यामुळे मोठा आधार नाही. परंत मा. सुरेशदादांच्या एसडी-सीड योजनेची मी लाभार्थी असल्यामुळे शैक्षणिक प्रगतीमध्ये येणाऱ्या मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची जिद्द मनामध्ये निर्माण झाली. मी स्वतःला भाग्यवान मानते कि दादांसारख्या थोर व्यक्तीचे मला आशीर्वाद मिळाले. मी शिष्यवृत्ती रकमेचा उपयोग स्टेशनरी आणि वह्या-पुस्तके आणण्यासाठी करते. मी टीवायबीकॉमला शिकत आहे आणि त्यासोबत सीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. हा कोर्स अवघड आहे परंतु दादांच्या प्रेरणेने मी अतिउत्साहित होऊन मनापासून अभ्यास करते. कारण माझे स्वप्न आहे कि ज्याप्रमाणे एसडी-सीड आम्हा विद्यार्थ्यांना मदत करते त्याप्रमाणे मी देखील गरजू विद्यार्थ्यांना मदत करीन. दादांच्या एसडी-सीड योजनेचा प्रवास अखंडित राहो. कारण त्यांच्यामुळेच तर आज हजारो विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसताना देखील उच्चशिक्षण घेत आहेत. म्हणून दादांना उदंड आयुष्य लाभो, हि प्रार्थना. धन्यवाद.
Name: Tambe Amol Ashok मी मागील चार वर्षे एसडी-सीड योजनेचा लाभार्थी आहे. मा. सुरेशदादांनी सुरु केलेली ही योजना केवळ आर्थिक मदत नसून ती एक नैतिक मदत होय. सध्याच्या काळात जिथे कोणी कोणाचंच नाही, त्या काळात सुरेशदादा यांनी सुरु केलेली ही योजना विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त आहे. या योजनेचे मूल्य त्यालाच कळते ज्याला त्याची गरज असते आणि मी त्या गरजवंतांपैकीच एक आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मिळणारी रक्कम माझ्यासाठी फार मोलाची आहे आणि त्याचा योग्य वापर आजवर मी करीत आलो आहे. मा. दादांना मी आश्वस्त करतो कि, त्यांनी ज्या उद्देशासाठी ही योजना सुरु केली आहे त्याची पूर्तता करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद.
Name: Akshay Chandrakant Jain सर्वप्रथम मी एसडी-सीडचे मनापासून आभार मानतो कारण मागील तीन वर्षांपासून मला त्यांच्याकडून शिष्यवृत्ती प्राप्त होत आहे. मागील वर्षी वडिलांचे छत्र हरपले आणि आई देखील अपंगावस्थेत आहे. दोन वर्षांपूर्वी मी मेडिकलला प्रवेश घेतला, परंतु पुढे काय करावे असा यक्ष प्रश्न समोर होता. घरात कमावणारे कोणीच नाही आणि अशा दुर्दैवी परिस्थितीत माझे सध्याचे शिक्षण आहे ते फक्त एसडी-सीड शिष्यवृत्तीच्या मदतीनेच. यामुळे मला व माझ्या आईला मानसिक आधार मिळाला आहे आणि त्यासाठी मी मा. सुरेशदादा जैन यांचे पुनःश्च मनापासून आभार मानतो. मा. दादांनी सुरु केलेल्या या उपक्रमामुळे जणू काही वडिलांचे छत्र मला मिळाले आहे. ईश्वर दादांना दीर्घायुष्य देवो व माझ्यासारख्या हजारो गरजू विद्यार्थ्यांना त्यांची छत्रछाया अशीच लाभो, हि प्रार्थना करतो.
Name: Jitendra Padam Naik मागील दोन वर्षांपासून मला एसडी-सीड शिष्यवृत्ती मिळत आहे आणि त्या मदतीने मी एम.ए. पत्रकारितेच्या व्दितीय वर्षात शिकत आहे. घरची परिस्थिती अतिशय बेताची. मी लहानपणापासून मोलमजुरी करून बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडील सतत आजारी आणि दुष्काळामुळे शेतात काही पिकत नाही. या परिस्थितीला कंटाळून नैराश्यामुळे भावाने देखील आत्महत्या केली. या घटनेमुळे माझा शैक्षणिक प्रवास सर्वत्र अंधारमय दिसत होता. परंतु अशा परिस्थितीत नरातला 'नारायण' व एक देव माणूस माझ्या मदतीला धावून आला. ते म्हणजे गरिबांचे कैवारी, दातृत्ववान मा. सुरेशदादा जैन. दादांनी माझ्या अंधारमय भविष्याला एक आशेचा किरण देऊन मला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. यामुळे दादांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
Name: Lalita Dilip Patil माझी घरची परिस्थिती फार सामान्य आहे. वडील शेतमजूर आहेत त्यामुळे माझा शैक्षणिक खर्च त्यांना पेलवणारा नाही. परंतु एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीमुळे माझ्या उच्च शिक्षणात त्याचा खूप हातभार लागत आहे. एसडी-सीड हि अशी एक संस्था आहे, ज्यामुळे सामान्य घरातील गुणवंतांना देखील त्यांच्या आशा-आकांक्षाविषयी विचार करण्यास प्रेरित करते. त्यामुळे मी दादांना सांगू इंच्छीते कि, तुमचा हा उपक्रम असाच चालू राहू देत आणि तुमच्यामुळे एक सामान्य घरातील दिव्यांनाही प्रकाशाची ज्योत दिसू देत. दादा, तुम्ही असे सदैव आम्हा विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहा. मी सुद्धा भविष्यात नोकरीला लागल्यावर माझ्याकडून होईल ती मदत नक्की करेन.
Name: Bhagyashri Liladhar Chaudhari माझे वडील रिक्षा ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे आम्हाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच माझे उच्च शिक्षण सुरु असल्यामुळे कॉलेजची फी भरणे, नवीन पुस्तके विकत घेणे यांसारख्या अनेक आर्थिक अडचणी तोंड वर काढतात. आणि अशा परिस्थितीत मला मागील सहा वर्षांपासून एसडी-सीड शिष्यवृत्ती मिळत आहे. त्यामुळे कॉलेजची फी भरणे मला शक्य झाले. शिष्यवृत्तीसोबतच एसडी-सीडमार्फत राबविले जाणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा यांच्या माध्यमातून माझ्यातील विविध कौशल्यांचा विकास होण्यासही मदत झाली. मुलाखतीला सामोरे कसे जावे, तयारी कशी करावी या गोष्टी समजल्या आणि आपणही सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. मा. दादांनी सुरु केलेल्या आणि आमच्यासारख्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कार्यरत असलेल्या एसडी-सीडला मी शुभेच्छा देते. दादांनी हा उपक्रम असाच चालू ठेवावा आणि त्यांनी आमच्याप्रती पाहिलेले स्वप्न आम्ही करणार याची मी ग्वाही देते. |