लाभार्थींचॆ मनॊगत 2016-17:
Name: Pranita Kishor Bhavsar I am grateful and thankful to SD-SEED for all their guidance and economical support for my graduation studies for BPTh Degree. Now its been my final year in this education for Physiotherapy and I am happy that a major contribution for my success and education has major role model as ‘SD-SEED’ being my back-bone for education. I am very thankful that today I can proudly say that in future, I may promisingly help the needy person for education and my success will surely pay off for this. Thanking you.
Name: Prathamesh Harishchandra Chitodkar माझी कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक खर्च कसा भागवणार हा विचार मनात असतानाच एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीने मला मोलाची साथ दिली. त्यांच्या मदतीने मला पुढील शिक्षण घेण्यासाठी बरीच मदत झाली आहे. मला सलग पाच वर्षांपासून एसडी-सीडकडून शिष्यवृती मिळत आहे. या संस्थेने समाजोपयोगी व विद्यार्थीहिताच्या दृष्टीने एक चांगले उपक्रम हाती घेतला आहे. मी त्यांना विनंती करतो कि, त्यांनी हा उपक्रम असाच पुढे यशस्वीरीत्या पुढे चालू ठेवून माझ्यासारख्या अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करावी. पुनःश्च मी एसडी-सीड संस्थेचे व त्यांच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो.
Name: Rucha Hemant Belsare मी इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत असून मागील पाच वर्षांपासून मी एसडी-सीडची शिष्यवृत्ती लाभार्थी आहे. माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना एसडी-सीडकडून शिष्यवृत्तीमार्फत हा जो मदतीचा हात मिळतो आहे तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. मुलांच्या पाठीवर मदतीचा हात ठेवणाऱ्या एसडी-सीडची मी खूप आभारी आहे कारण माझ्या शिक्षणात यांची मला मोलाची साथ मिळत आहे. हा उपक्रम असाच सुरु राहून अनेक मुलांना याचा लाभ मिळेल अशी मला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा एसडी-सीडचे खूप खूप धन्यवाद!
Name: Anil Dagdu Mali मागील चार वर्षांपासून मी एसडी-सीड योजनेंतर्गत खान्देशातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ घेत आहे. माननीय श्री. सुरेशदादा जैन यांनी उभारलेली एसडी-सीड ही भव्यदिव्य संस्था आहे जी खान्देशातील गोरगरीब गुणवंत विद्यार्थ्यांकरिता आर्थिक मदतकेंद्र आहे. यामुळे मी माझ्या आर्थिक अडचणींवर आतापर्यंत मात करीत आहे. माझ्या मते गोरगरिबांना केलेली ही एक अनमोल मदत आहे. दादांनी आमच्यासाठी वेळेवर केलेली आर्थिक मदत दैवरूपी आहे. दादांनी हे सत्र असेच पुढे चालू ठेवावे, हि विनंती.
Name: Renuka Dattatray Gurav मी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत असून मागील तीन वर्षांपासून मला या शिष्यवृत्तीचा लाभ होत आहे. माझे वडील हातमजुरी करून माझे शिक्षण पूर्ण करीत , परंतु त्यात या शिष्यवृत्तीची भर झाली आणि मला अधिक आधार मिळाला. मला पुस्तके व परीक्षेची फी भरण्यासाठी या शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे. त्यामुळे माझे आईवडील देखील मी शिक्षण पूर्ण करीत आहे हे पाहून अत्यंत व समाधानी आहेत. मी एसडी-सीडची मनापासून आभारी आहे, कारण मला अगदी वेळेवर त्यांची मदत मिळाल्यामुळे मला पुढे शिकण्याची प्रेरणा मिळाली.Name: Rushikesh Bhagvat Jagtap घरची आर्थिक परिस्थिती बरी नसल्यामुळे इंजिनीरिंगला प्रवेश घ्यावा की नाही हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित होता. माझ्या आईवडिलांकडून कॉलेजच्या फीचे पैसे भरण्याची क्षमता , परंतु पुस्तकांसाठी व इतर लागणाऱ्या खर्चासाठी ते सक्षम नव्हते. याच वेळेस मी वृत्तपत्रामध्ये एसडी-सीडबद्दल वाचले आणि मागील दोन वर्षांपासून मला एसडी-सीड शिष्यवृत्ती प्राप्त होत आहे. माझ्या आईवडिलांचा आर्थिक भार जणू एसडी-सीड या संस्थेने घेतला आहे, असे मला आज वाटते. जेव्हा मला ही शिष्यवृत्ती मिळते तेव्हा अजून खूप शिकण्याची, खूप काही करण्याची व आयुष्यात काहीतरी बनण्याची प्रेरणा देऊन जाते. यामुळे मला खात्री आहे की , भविष्यात मी नक्कीच यश संपादन करीन आणि या संस्थेचे माझ्या यशात मोठे योगदान . या संस्थेचा मी सदैव ऋणी राहीन. धन्यवाद एसडी-सीड.Name: Pooja Sunil Khente खरे सांगायचे तर 'बुडत्याला काडीचा आधार' तसे एसडी-सीडने मला आधार दिला आहे. माझे वडील हयात नसल्यामुळे एकट्या आईला माझा व माझ्या भावाचा शिक्षणाचा खर्च करणे फार कठीण जात होते, परंतु यात मदत मिळाली ती म्हणजे एसडी-सीडच्या शिष्यवृत्तीची. यामुळे मला पुस्तके-वह्या घेण्यास, कॉलेजची फी भरण्यास फार मोठी मदत झाली. माझे वडील नाहीत, पण आजोबांची भर मात्र मा. दादांनी भरून काढली. त्यांनी माझ्यासारख्या गरजू विद्यार्थ्यांनी त्यांचे शैक्षणिक ध्येय गाठण्यास मोलाची मदत केली आहे व करीत आहेत. यामुळे मी सदैव या संस्थेची ऋणी राहीन आणि मा. दादांचा हा उपक्रम सुरु करण्यामागे जे उद्दिष्ट आहे त्याची नक्कीच पूर्तता करीन. |