|  | Name: Jyoti Shamrao Borse Beneficiary Code: 1111129989
 Taluka: Pachora
 Education in the year 2011-12: B.E. (Computers) – Second Year
 | 
                        
                            | 
                                    मी पाचोरा तालुक्यातील लोहारा  ह्या खेडेगावातुन छोट्या घरातुन मोठे स्वप्न घेउन आलेली सर्व साधारण मुलगी. एस.डी-सीड शिष्यवॄत्ती मिळाल्यामुळे माझ्या जीवनात विश्वसनीय बदल झालेत.                   मला जेव्हा दहावीमध्ये ९१ टक्के गुण मिळाले तेव्हा माझ्या आई वडीलांच्या डोळ्यातुन  येणारे आनंदाश्रु खुप मोठ्या अपेक्षेने बघत होते.माझ्या वडीलांना लहानपणापासुनच वाटायचे  की माझी मुलगी ही इंजिनीअर होणार, पण त्यांच्या समोर पैशाचा खुप मोठा प्रश्न होता.  जेव्हा माझ्या वडीलांना कळले की, मला एसडी-सीडची शिष्यवॄत्ती मिळणार तेव्हा ते म्हणाले  की, 'देव हा माणसाच्या रुपात होतकरु विद्यार्थ्यांना मदत करायला आले आहेत’.                   मी आता डिप्लोमाच्या तिस-या वर्षाला असुन आतापर्यंतचा माझा कठीण प्रवास माझे गुरुवर्य  सुरेशदादा जैन यांच्यामुळेच पुर्ण झाला. मी व माझे आई-वडील दादांचे फार त्रुणी आहोत.  मी वचन देते की, माझ्या शिक्षणानंतर दादांच्या क्रुपेने एक यश्वस्वी इंजिनिअर होऊन  माझ्या उत्पनातील २५ टक्के भाग मी एसडी-सीड शिष्यवॄत्तीला देईन व माझ्यासारख्या गरीब  व खेडेगावातील मुलांना शिक्षणासाठी प्रेरणा देईल | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Renuka Sambhaji Lingayat Beneficiary Code: 1111123002
 Taluka: Pachora
 Education in the year 2011-12: Diploma in Computers – Second Year
 | 
                        
                            | 
                                    मी पाचोरा येथील छोट्याशा खेड्यातुन जळगावला इंजिनिअरिंग डिप्लोमा करावला आले. गावातुन इथे आल्यानंतर खर्चासाठी जास्त पैसा लागत होता. त्यात आमची घरची परिस्थिती बिकट त्यामुळे पैशाचा फार  प्रॅब्लेम यायचा. तेव्हा मी दादांच्या सर्त्कमाबद्दल पेपरमध्ये वाचले व मला एसडी-सीड  शिष्यवॄत्तीचा लाभ झाला आणि नंतर मला वडीलांकडे कधी मेसला पैसे मागावे लागले नाही. लहानपणापासुन एकले होते की राजकारणी लोक फक्त फुशारकी मारण्यात मारण्यात पटाईत,  पण दादांबद्दल माझे व माझ्या कुटुंबाचे मत अगदी पाण्यासारखे स्वच्छ व निथळ आहे.दादांनी जिल्ह्यातील गरजु विद्यार्थ्यांचे विशेषत: कोणत्याही जातीची मर्यादा न ठेवता मोठ्या  पुण्यकर्माच्या दिशेने वाटचाल चालु केली आहे व ती पुर्ण ही केली आहे. मलाही शिकुन झाल्यावर  माझ्या ऎपतीप्रमाणे दादांच्या सर्त्कमाध्ये खारीचा वाटा उचलन्यासाठी ममोमत इच्छा आहे.  दादांसाठी माझ्या आईने काढलेले शब्द - ’गरिबास्ले तारी राहना त्यास्ले देव सुखाची कधी  कमी पडू देणार नाही’.                   गेल्या दोन वर्षापासून माझे मनोगत मनात गर्दी करत होते, ते व्यक्त करण्याची मला संधी  दिल्याबद्दल मी एसडी-सीडची फार आभारी आहे | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Nikhil Rajendra Kumat Beneficiary Code: 1011078864
 Taluka: Dharangaon
 Education in the year 2011-12: B.E. – Second Year
 | 
                        
                            | 
                                    सर्वप्रथम मी संस्थेचे  अध्यक्ष, संचालक व निवड समिती सदस्यांचे मनस्वी आभार मानतो की ज्यांनी झानगंगेचे अमॄत  पिण्याची संधी सर्व गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली.
 मला दहावीमध्ये ९०.९२ टक्के गुण मिळाले होते, मला इंजिनीअर व्हायचे होते. परंतु अपु-या  पैशांमुळे गरीब मुलांना ऊच्च शिक्षण घेता येत नाही. कमी गुण असल्यावरही इतर श्रीमंतांची  मुल पैशाच्या बळावर चांगल्या शिक्षणसंस्थेमध्ये प्रवेश घेतला व उच्च पदावर जातात. हे  सगळ बघुन हुशार व बुद्धिमान असलेले परंतु गरीब मुल निराश होतात व त्यांची घुसमट होते.  माझ्या बाबतीतही हिच परिस्थिती होती, परंतु मातोश्री श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन  शिष्यवॄत्ती योजना देवासारखी धावून आली.
 
 मला डिप्लोमासाठी  शासकीय तंत्रनिकेतन मध्ये आय.टी. शाखेत प्रवेश मिळाला. मला शिष्यवॄत्ती मिळाल्यामुळे  डिप्लोमाचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यास भरपूर मदत झाली. सध्या मी जळगांव येथील  रायसोनी कॉलेज मध्ये तॄतीय वर्षात शिकत आहे. गेल्या चार वर्षापासून मला ही शिष्यवॄत्ती  मिळाल्यामुळे अभ्यासाची महागडी पुस्तके व शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी मला भरपूर आधार  मिळला.
 
 माझ्या शैक्षणिक प्रवासात या शिष्यवॄत्तीने सतत हात दिला आहे. मी माझे इंजिनिअर  होण्याचे स्वप्न पूर्ण करु शकेन, याची मला पूर्ण खात्री आहे.
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Dipali Vasant Vispute Beneficiary Code: 1111052327
 Taluka: Chalisgaon
 Education in the year 2011-12: B.E. (E&TC) – Second Year
 | 
                        
                            | 
                                    मी गव्हर्नमेंट  कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, जळगांव येथे शिकत आहे. मला मागील वर्षी म्हणजे २०१०-११ साली  मातोश्री प्रेमाबाई भिकमचंदजी जैन शिष्यवॄत्तीच्या रुपाने रु.७०००/- मिळाले आणि मला  त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी, वसतीगॄहात पैसे भरण्यासाठी व पुस्तके विकत घेण्यासाठी  खुप फायदा झाला.
 मला या शिष्यवॄत्तीचे  नियम आवडले कारण येथे जातीचा विचार केल जात नाही, येथे आपली गुणवत्ता आणि वार्षिक उत्पन्न  यांचा विचार करुन शिष्यवॄत्तीची रक्कम ठरविली जाते. त्यामुळे खरोखरच आर्थीकदॄष्ट्या  दुर्बल असणा-या अणि ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना याचा खुप फायदा होतो.  त्यामुळे ते सुध्दा जॉब लागल्यानंतर अशा संस्थांना डोनेशन देतील व त्याचा फायदा दुस-या  विद्यार्थ्यांना होईल.
 
 त्यामुळे खरोखरच मी दादांची खुप आभारी आहे.
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Gokul Vishwanath Mahajan Beneficiary Code: 1011145295
 Taluka: Raver
 Education in the year 2011-12: B.Tech. (Chemical) – Third Year
 | 
                        
                            | 
                                    मित्रांनो, गेल्या  तीन वर्षापासून ’मी मातोश्री प्रेमाबाई भिकमचंदजी जैन शिष्यवॄत्ती’चा लाभ घेत आहे.  माझ्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे मला शिक्षण घेतांना अनेक  अडचणींना सामोरे जावे लागले. बहुतेकदा पैशाअभावी महत्वाच्या कामात व्यत्यय येऊ लागले,  अश्या वेळी मी निराश झालो, पण सुरेशदादांच्या अलौकीक अश्या या योजनेमुळे मला दिलासा  मिळाला व नवीन यशोशिखरे गाठण्यासाठी मी सज्ज झालो आहे.
 दादांच्या आर्थिक  मदतीमुळे माझ्यात जणू नवीन उर्जा संचारली व प्रेरित होउन मी बी.टेक-केमिकल इंजिनिअर  तॄतीय वर्षाला उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात प्रथम आलो. या यशामुअळे दादांच्या शिष्यवॄत्तीचे  चीज झाल्यासारखे मला वाटले.
 
 माझ्या शिक्षणानंतरही  मी एसडी-सीड उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत माझे योगदान देण्याचा प्रयत्न करीन.दादांना दिर्घायुष्य लाभो, हिच प्रभुचरणी प्रार्थना
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Tushar Keshav Wagh Beneficiary Code: 1011021560
 Taluka: Bhadgaon
 Education in the year 2011-12: M.Sc. – First Year
 | 
                        
                            | 
                                    मा. दादासाहेब,  मी सातवी पासून सलून व्यवसाय करुन माझे शिक्षण पुर्ण करीत आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून  आपल्या कॄपेने मी आपल्या संस्थेकडुन शिष्यवॄत्ती प्राप्त करीत आहे, ज्यामुळे माझ्या  शिक्षणाला त्याचा हातभार लागतो आहे. गेल्या दोन वर्षापासून माझे मनोगत व्यक्त करण्याचा  प्रयत्न करीत आहे.
 प्रथमत मी मा. दादांचे आभार मानतो कारण एसडी-सीड या संस्थेमार्फत गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक  मदतीचा हात पुढे करुन मा. दादांनी दातॄत्वाची एक नवीन एक चळवळ सुरु केली आहे, ज्यामुळे  हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेतील काटे दादांनी स्वत:च्या हातांने जणू दुर  केले अहेत. हे कार्य करुन दादांनी शिक्षणक्षेत्रातील दानवीर कर्णाची भुमिका पार पाडली  आहे. त्यांच्या या कार्याचे श्रेय हे सर्वस्वी त्यांच्या मातेला आणि त्यांची शिकवण  व संस्कारांना जाते. सर्व विद्यार्थिमित्रांना मला आवर्जुन सांगावेसे वाटते की, आपण  प्रत्येकाने ही शिकवण अंगीकारावी की आपण समाजाचे व देशाचे काहीतरी देणे लागतो याची  जाण प्रत्येकाने बाळगावी.
 
 एसडी-सीड शिष्यवॄत्ती  योजनेचा अश्वमेघ असाच मार्गक्रमण करत राहावा व इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पारंगत  व तरबेज करण्याचा प्रयत्न करावा. आपले विद्यार्थी एक नवीन साम्राज्य तयार करु शकतील.  माजी व नवीन शिष्यवॄत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपण एक सेवाभावी संस्था  किंवा संघटन स्थापन करुन त्यांना देशाचे, समाजाचे व संस्कॄतीचे आधारस्तंभ म्हणून उभे  करु शकु व या कामासाठी माझी तयारी आहे.
 
 पुनश्च : एकदा दादांचे मनस्वी आभार.
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Nilam Bharat Bafna Beneficiary Code: 1111126345
 Taluka: Pachora
 Education in the year 2011-12: B.E. (Mechanical) – Third Year
 | 
                        
                            | मी गव्हर्नमेंट  कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, जळगांव येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत  आहे. मला मागील तीन वर्षा पासून एसडी-सीडची शिष्यवॄत्ती मिळत आहे. मी आदरणीय दादासाहेब  म्हणजेच सुरेशदादा जैन यांची अत्यंत आभारी आहे. जळगांवमधील एक प्रतीष्ठीत व्यक्ती,  ज्यांनी एसडी-सीड ही अतिशय चांगली योजना सुरु केली ज्याद्वारे जिल्ह्यातील गुणवंत व  गरजु विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पूर्तीसाठी मदत करुन त्यांना प्रोत्साहीत  करण्यात आले.माझा शैक्षणिक खर्च भागविण्यात या शिष्यवॄत्तीचा मला फार लाभ झाला व याचा मी  योग्य प्रकारे वापर केल. मी एसडी-सीडची अत्यंत आभारी आहे व त्यांचा विस्तार दरवर्षी  वाढत चालला आहे त्याबदद्ल त्यांना मन:पुर्वक सदिच्छा देते. विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या  या शिष्यवॄत्तीमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला जातो त्यामुळे ते देखील चांगला अभ्यास  करुन चांगले गुण मिळवितात यात काहीच शंका नाही. | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Prajakta Arun Shimpi Beneficiary Code: 1111124452
 Taluka: Pachora
 Education in the year 2011-12: D.Ed. – First Year
 | 
                        
                            | 
                                    ज्यावेळी मी बारावी  झाली त्यावेळी कळलं की आयुष्यात स्वत:चं काही ध्येय असावं आणि ते मी ठरविलसुध्दा. पण  नंतर विचा केला की ध्येयपुर्तीसाठी नुसता अभ्यास व आत्मविश्वास असुन चालत नाही तर त्यासाठी  पैसापण लागतो. परिस्थितिमुळे स्वप्नपुर्ती होईल असे वाटत नव्हते परंतु एक मार्ग सापडला.  तो म्हणजे एसडी-सीडच्या शिष्यवॄत्तीचा. मला सुरेशदादांच्या संस्थेबदद्ल माहिती मिळाली  की होतकरु वुद्यार्थ्यांसाठी जे आपल्या स्वप्नपुर्तीसाठी रात्रंदिवस धडपडत असतात त्यांच्यासाठी  एक प्रेरणास्तोत्र म्हणून दादा नेहमी आर्थिक मदत करीत असतात. म्हणुन मी सुध्दा माझ्या  स्वप्नपुर्तीसाठी या संस्थेकडे मदत मागितली व ती मला मिळाली देखील. त्यामुळे माझ्यात  प्रेरणा निर्माण होवुन मला माझे स्वप्न नक्कीच पुर्ण होईल असे वाटु लागले आहे. मला  मिळालेल्या मदतीच मी नक्कीच चीज केल ते म्हणजे डि.टी.एड.च्या पहिल्या वर्षाला प्रथम  क्रमांक मिळविला. याचं सर्व श्रेय हे माझे आई-वडिल, गुरुजनवर्ग सुरेशदादा, माझे मैत्र-मैत्रीणी  यांना देते कारण आज जर हे नसते तर कदाचित मी इथपर्यंत कधीच पोहचले नसते.
 मी नेहमी दादांना आदर्श मानते व त्यांचा आदर करते. मीच नव्हे तर जे जे विद्यार्थी  ही मदत घेतात ते देखील त्यांना आदर्श मानतील, कारण दादांनी शिक्षणासाठी जे मदतीचं पाउल  उचललेल आहे ते आमच्यासाठी खुप महत्वाचं आहे. आज असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांच्याजवळ  कला आहे परंतु त्यांची आर्थीक परिस्थिती फार बिकट आहे, पण दादांच्या रुपाने अशा विद्यार्थ्यांना  मार्ग मिळतो तो म्हणजे शिक्षण घेण्याचा. म्हणुनच दादांना खुप खुप धन्यवाद त्यांनी आम्हाला  मदत केली.
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Rahul Shriram Patil Beneficiary Code: 1011124315
 Taluka: Pachora
 Education in the year 2011-12: B.E. (Civil) – First Year
 | 
                        
                            | मी शासकीय अभियांत्रिकिचा सिव्हिल  इंजिनिअर दुस-या वर्षाचा विद्यार्थी असुन मला एसडी-सीड तर्फे देण्यात येणा-या स्कॉलरशिपचा  अतिशय लाभ झालेला आहे. मी इयत्ता १२ वी पास झाल्यावर जेव्हा जळगांवसारख्या शहरात पुढील  शिक्षणासाठी आलो. तेव्हा मला पैशांची खुप अडचण होती. कारण वडिलांचा व्यवसाय हातमजुरी  असल्याने माझ्याकडे पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च नव्हता आणि त्यामुळे मी पुढील शिक्षण  घेण्याचा विचार सोडून दिला होता. परंतु श्री सुरेशदादा जैन यांच्या एसडी-सीड तर्फे  देण्यात येणा-या शिष्यवॄत्तीमुळे माझे विचार बदलले आणि जो पुढील शिक्षण करण्याचा विचार  सोडून दिला होता तो मी या शिष्यवॄत्तीमुळे शिक्षण न घेण्याचा विचार बदलला आणि मी इंजिनिअरिंगच्या  पहिल्या वर्षाला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. तरी मी माननीय सुरेशदादा जैन यांचा  आभारी आहे. | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Priya Ajit Chordia Beneficiary Code: 1111034534
 Taluka: Bhusawal
 Education in the year 2011-12: B.E. (Computer) – Final Year
 | 
                        
                            | 
                                    महोदय,माझ्या पदविका  अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षा पासुन तुम्ही देत असलेल्या आर्थिक मदतीसाठी (रु.३५०००/-)  मी आपले प्रामाणिकपणे आभार मानते. एसडी-सीड च्या शिअष्यवृत्तीची मी लाभार्थी ठरली ही  माझ्यासाठी फार सन्माननिय बाब आहे.
 
 मी सिंहगड ऑफ इंजिनिअरिंग,  पुणे येथुन बी.ई.कॉंम्प्युटर ची पदवी संपादन केली आणि अक्षरश: माझे स्वप्न पूर्ण झाले.  आमची कौटुबींक आर्थीक परिस्थिती लक्षात घेता, मी चांदवड येथे डिप्लोमाला ८५ टक्के गुण  मिळवुन सुध्दा मी पदविकेसाठी या संस्थेत प्रवेश घेईन असे मला स्वप्नातसुध्दा मला वाटले  नव्हते. मी पदविकेच्या तीन्ही वर्षी फस्ट क्लास कायम ठेवला आणि माझे कौशल्य समॄध्द  व्हावे यासाठी पुढे एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करायची या दिशेने माझी वाटचाल सुरु  आहे.
 
 मला एसडी-सीड शिष्यवॄत्ती देवुन तुम्ही माझी आर्थिक परिस्थिती मजबूत केली व  त्यामुळे मी माझ्या अभ्यासात पुर्ण लक्ष केंद्रित करु शकले. तुमच्या दातॄत्वामुळे मलादेखील  दुस-यांना मदत करण्याची व समाजाने आपल्याला जे दिले त्याची परतफेड करण्याची प्रेरणा  मिळली. मला आशा आहे की एके दिवशी मी सुध्दा विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय व तांच्या  स्वप्नपुर्तीसाठी नक्कीच मदत करीन, जी तुम्ही मला आज केली आहे.
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Panchshila Ganesh Sabale Beneficiary Code: 1111035042
 Taluka: Bhusawal
 Education in the year 2011-12: Diploma in E&TC – Third Year
 | 
                        
                            | 
                                    मी शासकीय अभियांत्रिकी  महविद्यालयात शिकत आहे. माझे वडिल हातमजुरी करुन अमच्या चारही बहिणी-भावंडांचे शिक्षण  पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
 मला इंजिनिअरिंगला  ऍडमिशन घ्यायचे होते, परंतु त्याला लागणा-या खर्चामुळे आम्ही घाबरलो होतो. पण त्याचवर्षी  मला दादांकडुन स्कॉलरशिप मिळाल्याने मला माझे स्वप्न साकार करण्यात यश मिळाले. मला  मागील दोन्ही वर्षी वेळोवेळी स्कॉलरशिप मिळत असल्याने माझ्या शैक्षणिक बळात भर पडत  गेली व मी माझे स्वप्न पुर्ण करण्यास यशस्वी झाले म्हणुन मी या संस्थेचे मनपुर्वक आभारी  आहे.
 या संस्थेत खुप  चांगले कार्यक्रम राबविण्यात येतात व त्यातुन नवीन नागरीक जन्माला येतो म्हणजेच जीवनाला  कलाटणी मिळते. या संस्थेमुळे मला क्लासेस व पुस्तके घेण्यासाठी सवलत मिळाली आणि त्यामुळे  मी यशस्वी होवू शकले.
 
 ज्योतीबा फुले यांनी शाळा काढल्या, शाहु महाराजांनी मोठमोठे पुरुष निर्माण केले.  सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवॄत्तीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विलायतेला जावुन  शिक्षण घेवू शकले व भारताचे शिल्पकार झाले. त्याचप्रमाणे दादांनीही तोच वारसा पुढे  चालु ठेवला असुन हे एक राष्ट्रीय कार्य त्यांनी त्यांच्या हाती घेतले आहे म्हणून मी  त्यांचे व त्यांच्या समितीचे मन:पूर्वक आभारी आहे. मी पुढे या संस्थेच्या नक्कीच उपयोगात  पडेल असा माझा ध्यास आहे.
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Kalpana Prabhakar Shirude Beneficiary Code: 1111125287
 Taluka: Pachora
 Education in the year 2011-12: B.Sc. - Third Year
 | 
                        
                            | मातोश्री श्रीमती  प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवॄत्तीचा लाभ २०१०-२०११ या साली घेतला. त्यामुळे  माझे वस्तिगृहाचे ऍडमिशन लवकर झाले व मला अभ्यासाला त्याचा फायदा झाला. सदर योजना ही  खरोखरच अतिशय चांगली योजना आहे, ज्यामुळे इतर शैक्षणिक खर्च होण्यास मला मदत झाली.सदर योजनेचा जास्त लाभ हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होतो कारण ग्रामीण  भागातील विद्यार्थी पैसे नसल्याने उच्च शिक्षण घेवू शकत नाही. शिष्यवॄत्तीसारख्या अशा  योजना असतील तर विद्यार्थीही पुढे जायला घाबरत नाहीत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  या योजनेचा लाभ घेवून आपले शिक्षण पूर्ण करावे. | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Geeta Mulkumar Thakkar Beneficiary Code: 1111092558
 Taluka: Jalgaon
 Education in the year 2011-12: B.Com. – Third Year
 | 
                        
                            | 
                                    मातोश्री श्रीमती  प्रेमाबाई भिकमचंदजी जैन म्हणजे आमचे लाडके सुरेशदादा जैन तसेच एसडी-सीड हे माझ्यासाठी  एक आधारस्तंभ आहे. कारण मी एक ओपन कॅटेगरीतील विद्यार्थीनी, त्यामुळे मला कुठुनही आर्थीक  मदत मिळत नाही, पण दादांच्या एसडी-सीडने उचललेल्या पावलामुळे मला तसेच इतर गरजुंना  आर्थिक मदत मिळली. मला वाटत होते की माझे स्वप्न पुर्ण होणार नाही परंतु एसडी-सीडमुळे  तसेच दादांमुळे ते पूर्ण होईल असे मला वाटते. दादांच्या मदतीमुळे मी महाविद्यालयात  चांगले शिक्षण घेवुन चौथा क्रमांक प्राप्त केला तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत  युवारंगात समुह नॄत्यात गोल्ड मेडल व अविष्कार स्पर्धेतही एनएमयु अंतर्गेत भाग घेवून  यश प्राप्त करु शकले.
 एसडी-सीडने दिलेल्या  लाभार्थी कार्डामुळे क्लासेस फी, स्टेशनरी इ. मध्ये सवलत मिळून चांगलाच हातभार लागला.  इतकेच नव्हे तर बॅकींग एज्युकेशन लोन याची माहीती मिळाली. मरंतु मला असे वाटते की,  सगळ्या सोयी चांगल्या मिळत आहे पण यात आणखी एक भर करावी ती म्हणजे अतिरिक्त लेक्चर्स,  सेमिनार्स, माहिती पुस्तके इ. मी कॉमर्स विद्यार्थीनी असल्यामुळे त्या विषयाशी निगडीत  लेक्चर्स, जॉब, स्टडी, एज्युकेशन संधी, पुढचे कोर्सेस याबद्द्ल देखील माहीती मिळावी,  अशी माझी मनापासून विनंती.
 
 शेवटी मला असे वाटते की, गेलेल्या शैक्षणिक वर्षात आणि इतर मी जे घवघवीत यश  प्राप्त केले ते फक्त दादांमुळे अणि एसडी-सीड मुळेच. यापुढेही मला त्यांच्यापासून अशीच  मदत व्हावी, ही नम्र विनंती.
 | 
                        
                            | 
 | 
                        
                            |  | Name: Tushar Murlidhar Patil Beneficiary Code: 1011144251
 Taluka: Raver
 Education in the year 2011-12: Diploma in Computers – Third Year
 | 
                        
                            | 
                                    प्रथम मी मा. श्री.  सुरेशदादा जैन आणि सर्व एसडी-सीड योजनेचे सहकारी यांचे आभार मानतो.
 मी सध्या व्दितीय  वर्ष संगणक अभियांत्रिकीला सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वडगांव पुणे, या महाविद्यालयात  शिकत आहे.
 
 मी मागील तीन वर्षापासुन  मातोश्री श्रिमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन शिष्यवॄत्ती घेत आहे व त्यामुळे मी माझे  पदविका शिक्षण पुर्ण करु शकलो. या संस्थेने मला मदत केल्यबदद्ल खरचं मी खुप आभारी आहे.  गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनासुध्दा उच्च शिक्षण घेण्यात फार मोलाचा वाटा  या योजनेने केला आहे.
 
 माझे ध्येय संगणक  अभियंता व्हायचे आहे, परंतु घरच्या गरीब परिस्थितीमुळे कदाचीत हे शक्य नसते. पण या  शिष्यवॄत्तीमुळे हे पूर्ण झाले. अजुन पुढे खुप शिक्षण घेण्याची इच्छा आहे व या योजनेच्या  लाभातून हे शक्य होणारच आहे.
 
 मी या संस्थेला एक वचन देतो की, माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेवढी मला मदत  करता येईल तेवढी मदत मी करायला तयार आहे जेणेकरुन इतर गरीब मुलांनासुध्दा या योजनेचा  लाभ मिळेल. त्यांना आपण उच्च शिक्षण घेण्यात मदत मिळेल.
 | 
                        
                            | 
 |